TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंतराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचे तीन राज्यात सिंडीकेट ?

क्रिप्टो करन्सीतून हवालामार्गे येत होता पैसा

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या आंतराष्ट्रीय सिर्डकिटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या सिडर्डीकेटची व्याप्ती महाराष्ट्र, राजस्थान व पश्चिम बंगाल पर्यंत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या सिंडीकेटमधील मुख्य सूत्रधारांसह परदेशातील आणखी कोणी यात सहभागी आहेत या याचा शोध घेण्यासाठी अटकेतील ललित कोल्हेंसह आठ संशयितांना दि. ४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अॅमेझॉन इतर बँक व कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून परदेशी नागरिकांना फसविणाऱ्या बनावट कॉल सेंटवर पोलिसांनी रविवारी छापा टाकला. शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या सिंडीकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर याठिकाणाहून ३१ लॅपटॉप, ७ मोबाईलसह इंटरनेट व कॉल सेंटरसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी राकेश आगारिया, ललित कोल्हे, नरेंद्र अगारिया, आदिल सैय्यद निशार अहमद सैय्यद, इम्रान अकबर खान, मोहम्मद जिशान नूरी पिता मो. नूर आलम, शाहबाज आलम मो. शाहबउद्दीन, साकीब आलम शहाबउद्दीन, मोहम्मद हाशिर मोहम्मद राशिद यांच्याविरुद्ध संघटीत गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार अधिनियमांतर्गत इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. ४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

कोणत्या माध्यमातून दिली नोकरी
या गुन्ह्यातील आदिल सैय्यद निशार अहमद सैय्यद, इम्रान अकबर खान व अकबर हे तिघे मुंबई येथील असून कॉल सेंटरमध्ये काम करणारे हे कोलकता येथील असून त्यांची ओळख अशी झाली. त्यांना नोकरीसाठी कोणत्या माध्यमाचा वापर करुन त्यांना नोकरीवर ठेवले. तयाचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जाणार आहे.

माजी महापौर कोल्हेंवर १९ गंभीर गुन्हे
ज्यांच्यावर मालकीच्या फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर सुरु होते. ते माजी महापौर ललित कोल्हे यांच्यावर तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासधिकारी गणापुरे यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर संशयिताचे वकील अॅड. सागर चित्रे यांनी हे गुन्हे कोल्हे यांच्या राजकीय गुन्हे असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. फसवणुकीसाठी ग्राहकांचा डाटा कोठून मिळविला. तसेच संशयितांना बोगस कॉल सेंटर चालविण्यासाठी एक्स लाईट आणि व्हीपीएन सारख्या नेटवर्क वापरण्याचे प्रशिक्षण कोणी दिले याचा देखील तपास केला जात आहे.

फॉरन्सी लॅबमध्ये जप्त केले लॅपटॉप
कॉल सेंटरमध्ये मिळून आलेल्या लॅपटॉपमधून फसवणूक झालेल्यांची माहिती संकलीत केली जाणार आहे. तसेच त्याकरीता जप्त केलेले लॅपटॉप हे नाशिक येथे फॉरेन्सीकच्या लॅबमध्ये पाठविले जाणार असून तेथे यातील संपुर्ण डेटा कॉपी करुन त्यानुसार तपास केला जाणार आहे.

पैसा क्रिप्टो करन्सीतून हवालामार्गे येत होता भागात
कॉल सेंटरमधून फसवणूक झाल्यानंतर मिळालेली परकीय चलनातून सायबर ठग हे क्रिप्टो करन्सी खरेदी करीत होते. त्यानंतर तो पैसा मुंबईच्या एजंटमार्फत हवालामार्गे भारतात मागवून ती रक्कम भारतीय चलनांमध्ये रुपांतरीत करीत असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोल्हेंनी केले होते हॉटेलचे रुम
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेले संशयित आदिल सैय्यद निशार अहमद व अकबर हे बोगस कॉल सेंटरचे काम पाहत होते. त्याकरीता ते जळगावला आल्यानंतर ते शहरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे थांबले होते. त्या हॉटेलचे रुम हे माजी महापौर कोल्हे यांनी बुक करुन त्याचे पैसे देखील त्यांनी दिल्याची माहिती, तपासधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. नितीन गणापुरे यांनी न्यायालयात मांडली.

बनावट कागदत्रांद्वारे मिळवले सीमकार्ड
अटकेतील संशयित व फरार असलेल्या संशयितांमध्ये अनेकवेळा कॉल झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून संपर्कात असल्याचा सीडीआर रिपोर्टमधून माहिती समोर असल्याचे तपासधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले. तसेच घटनास्थळाहून मिळालेल्या मोबाईलमधील सीमकार्ड हे बनावट कागदपत्रांद्वारे घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonInternational fake call center syndicate in three states

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
Next Post

प्रा. प्रशांत कुंभार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

May 21, 2026

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?

October 29, 2021

Black Jack Game Top2Play

October 28, 2022

चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अनोखी ऑफर, म्हणाले…

October 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group