जळगाव (प्रतिनिधी) विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेलेल्या ७८ वर्षीय वृध्द महिलेचा पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनीवारी दुपारी घडली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जनाबाई शिवराम कोल्हे वय ७८ रा. पातोंडा ता.चाळीसगाव असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.
जनाबाई कोल्हे या वृध्द महिला आपल्या परिवारासह पातोंडा गावात वास्तव्याला आहे. शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी गावातील बापू विठ्ठल पाटील यांच्या शेतातील विहीरीजवळ पाणी काढण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाय घसरला व त्या विहिरीत पडल्या त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
















