TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यंदाही नूतन मराठा महाविद्यालयात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली “नवसृजन” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

उद्घाटन समारंभाला नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले आणि सध्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळावर राज्य समन्वयक म्हणून कार्यरत असलेले मा श्री विनोद ढगे यांची उपस्थिती लाभली तसेच बक्षिस समारंभ आणि समारोपीय सत्राला नूतन मराठा महाविद्यालयाचीच माजी विद्यार्थीनी असलेल्या आणि नुकतीच राज्यसेवा परिक्षेत जिल्हा उपनिबंधक म्हणून ज्यांची निवड झालेल्या भारती रविंद्र पाटील यांची उपस्थिती लाभली.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच भावी वाटचालीत यशस्वी भरारी घेता येईल या उद्देशानेच अशा उंच भरारी घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलनात बोलविण्याचा दुरदृष्टिकोन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांचा यातून दिसून आला. स्नेहसंमेलनाला महाराष्ट्र गीताने आरंभ झाला तर प्रा रत्नाकर कोळी लिखित तथा डॉ राहुल संदानशिव यांनी गायलेल्या काॅलेज गीताने प्रारंभ करण्यात आला.

कविता,गजल,गायन, नृत्य असे एकापेक्षा एक सरस बहारदार कलाप्रकारातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याची छाप सोडली. तीन तास चाललेल्या या बहारदार स्नेहसंम्मेलनाचे सुत्रसंचलन प्रा इम्रान खान आणि प्रा मुक्ती जैन यांनी केले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांसह महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ एम एस पाटील, समन्वयक डॉ के बी पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ एन जे पाटील आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ राहुलु संदानशिव उपस्थित होते.

उद्घाटन सत्रातील प्रमुख अतिथी म्हणून विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अशा स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच मी महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळापर्यंत पोहचून याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आज प्रमुख अतिथी म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि यात माझ्या अंगी असलेल्या कलेचा जितका वाटा आहे तितकाच माझ्या कलेला वाव देणाऱ्या या महाविद्यालयाचा देखील वाटा आहे अशी प्रेमळ भावना व्यक्त करत, नूतन मराठा महाविद्यालय म्हणजे जळगांव चे सांस्कृतिक केंद्र आहे असा आपल्या मायबाप काॅलेजचा गौरव करुन त्यांनी आपल्या पहाडी आवाजात आणि शाहिरी शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी आपल्या महाविद्यालयातून असे अनेक हिरे आजपावेतो घडले आणि ते मोठ्या अभिमानाने आम्ही नूतन मराठा महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत असे गर्वाने सांगतात तेव्हा आनंदाला सिमा उरत नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ राहुल संदानशिव यांनी आयोजनाची भुमिका स्पष्ट केली तसेच सुत्रसंचलन डॉ आफाक शेख यांनी तर आभार समन्वयक डॉ के बी पाटील यांनी मानले. बक्षीस वितरण आणि समारोपीय सत्रातील प्रमुख अतिथी मा. भारती रविंद्र पाटील यांनी कोणताही क्लास न लावता परिस्थितीवर मात करून कसे यश संपादन केले याबद्दल थोडक्यात संवाद साधत मनोरंजनासोबत ज्ञानार्जन करण्यासाठी देखील तत्परता दाखवली पाहिजे असे सांगून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ एल पी देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयाचे ग्रंथालय अनेक दर्जेदार ग्रंथांनी भरलेलं आहे शिवाय महाविद्यालयाच्या वेबसाईटवर देखील हे सर्व ग्रंथ उपलब्ध असून वेगवेगळ्या दर्जेदार अंक, नियतकालिके आणि जगातील आणि भारतातील प्रत्येक मुख्य भाषेतील वर्तमानपत्रे देखील उपलब्ध आहेत त्याचा आपण लाभ घेवून आगामी काळात अशाच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बनण्याची संधी सोडू नका असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मा भारती पाटील यांचे वडील श्री रविंद्र भीला पाटील हे देखील उपस्थित होते. मुलीच्या यशस्वी वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे म्हणून पुष्प गुच्छ आणि मोमेंटो देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्रात विद्यापीठ आणि महाविद्यालयात प्रथम,द्वीतीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी तसेच, एन एस एस, एन सी सी आणि क्रिडा विभागात विशेष कामगिरी करणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबंधित सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याही सत्राचे सुत्रसंचलन डॉ आफाक शेख यांनी तर आभार उपप्राचार्या डॉ माधुरी पाटील यांनी मानले. स्नेहसंमेलनास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी पुर्णवेळ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामांना, रखडलेल्या प्रकल्पांना गती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चविष्ट स्वयंपाक न केल्यानं पत्नी-सासूकडून घरजावयाला मारहाण ; पोलिसात तक्रार

November 4, 2021

पहिले तीन पती, तरी चौथ्याशी लग्न ; सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा !

August 26, 2022

ममता बॅनर्जी आज मुंबई दौर्‍यावर ; मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट !

November 30, 2021

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group