TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसैनिकांकडून भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासून चोपले, राम कदम संतापले

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत या ना त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. पण आता मुद्याची लढाई पार गुद्यावर आली आहे. पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंडाला काळे करून चांगलाच चोप दिला. पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाच्या तोंडाला काळे फासून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कृत्यावरून भाजपचे आमदार राम कदम शिवसेनेवर चांगलेच संतापले आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहराचे माजी भाजप अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमधील नाराज शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना भर रस्त्यात तोंडाला काळे फासून विठ्ठल मंदिर परिसरात धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे विज बिल विरोधात आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ शब्दांचा वापर केला. त्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली. याचा जाब विचारण्यासाठी पंढरपूर शिवसेना माजी अध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यांची नामदेव पायरी ते पश्चिमद्वार अशी धिंड काढण्यात आली. कटेकर यांच्या हातात बांगड्या, हार, बुक्का लावून या वक्तव्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडून करण्यात आला.

याबाबत राम कदम म्हणाले की, ‘पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग. सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते’, अशा शब्दांत राम कदम यांनी संताप व्यक्त केला. याशिवाय, ‘हे सगळं ठरवून ? निद्रिस्त अवस्थेत असलेला महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

एल्गार परिषदेच्या आयोजकांचा शरजील उस्मानीला पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजचा दिवस महत्वाचा ! मुंबईत पुन्हा लागणार कडक निर्बंध? ‘लोकल’बद्दलही महापौरांनी दिले संकेत

April 2, 2021

अवघ्या पाच दिवसांवर लग्न अन् तरुणाचा विहरीत पडून बुडून मृत्यू

April 20, 2022

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

March 26, 2022

जळगाव : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड !

June 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group