TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा ; ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in आरोग्य, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील २० ते २५ गावांना मागील दोन दिवसात चक्रीवादळासह झालेल्या अतिवृष्टीने तडाखा दिला. यात तालुक्यातील तालुक्यातील सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. २५० घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, आज बुधवारी सकाळपासून भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.

आमदार गिरीश महाजन यांनी आज सकाळपासून जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकरी व नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. दरम्यान, आपले दुःख मांडताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. निसर्गाने सर्व काही हिरावून नेले. आता जगायचे कसे? हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. संसार उघड्यावर आल्याने अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

नुकसानग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले, की गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, कापूस, मका यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

अजिंठा डोंगररांगांमध्ये तसेच जामनेर तालुक्यात सोमवारी व मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरची पत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

‘या’ गावांना बसला सर्वाधिक फटका

जामनेर तालुक्यातील २० ते २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये समोर आले आहे. काही ठिकाणी अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील हिंगणे, ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक, रामपूर, लहासर, ढालशिंगी, जुनोने, तळेगाव आणि पहूर, टाकळी बुद्रुक, मेणगाव, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी, तिघ्रे वडगाव, भागदरा, तोंडापूर, शेळगाव, कासली व सावरला या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्वच ठिकाणी शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, शेतकऱ्यांच्या हाती आता काहीही लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

मुलींना मिळणार आता एनडीएत प्रवेश ; केंद्राची कोर्टात माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2025 !

July 18, 2025

कुरियर बॉयला चहातून गुंगीचे औषध देऊन बसमधून ६४ लाखांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

June 28, 2023

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने राबवले विविध कार्यक्रम !

July 8, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १७ नोव्हेंबर २०२३ !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group