धरणगाव (प्रतिनिधी) येथील ११० वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी प.रा. विद्यालयाला महाजन परिवाराच्या वतीने कै. राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ दहावीत शाळेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस फिरता भव्य चषक महाजन परिवाराचे सदस्य कै.राजेंद्र किसन महाजन यांचे सुपुत्र चि.जितेश(सोनू ), राजेंद्र महाजन, भाचे विनायकभाऊ महाजन, सामाजिक कार्यकर्ते पवनभाऊ महाजन, कु.अंकिता विनायक महाजन यांच्या हस्ते
शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे व पर्यवेक्षक के.आर.वाघ यांना सुपूर्द करण्यात आला. ” कै. राजेंद्रभाऊ हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेतृत्व कर्तृत्व, दातृत्व, प्रभुत्व या गुणांचे समुच्चय होते.प.रा.विद्यालयातील शेकडो गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्य देऊन सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली.चषकाच्या रूपाने त्यांची स्मृती कायम जपली जाईल,” अशा शब्दांत मुख्याध्यापक डॉ. सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त करून महाजन परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांनी केले.