जळगाव (प्रतिनिधी) शहरात काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत आमदार सुरेश भोळे खासदार स्मिता वाघ यांनी प्रशासनाच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
जळगाव शहरातील अपघातग्रस्त स्पॉटवर स्पीड ब्रेकर, सिग्नल तसेच अतिक्रमण याबाबत वारंवार प्रशासनाला सूचना करून देखील उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या मुद्द्यावरून आज आमदार सुरेश भोळे आणि स्मिताताई वाघ यांनी राष्ट्रीय महामार्ग, महापालिकेसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. लोकप्रतिनिधी देत असलेल्या सूचनांचे पालन अधिकारी करत नाहीत. त्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. लोक मरण्याची प्रशासन वाट बघतोय का?, लोक आंदोलन करतात तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतात परंतु ठेकेदारांवर कधीच गुन्हा दाखल होत नाही, असा संताप देखील आमदार भोळे यांनी बैठकीत व्यक्त केला.