TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळविणारा गिरीश महाजनांचा नातेवाईक असल्यामुळे प्रकरण दडपले जातेय ; पिडीत पित्याचा पोलीस अधिक्षकांकडे तक्रारी अर्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in गुन्हे, जळगाव, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. परंतू ६ दिवस ओलांडल्या नंतरही मुलीचा शोध लागत नसल्यामुळे हताश पिडीत पित्याने थेट पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेत एक तक्रारी अर्ज दिला. या तक्रारी अर्जात त्यांनी आपल्या मुलीला पळवून नेणारा मुलगा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा चुलत साला व एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच आणखी एका बड्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्यामुळे मुलीचा तपास लागत नाही. तसेच मुद्दाम प्रकरण दडपले जात असून जामनेर पोलिसांच्या तपासावर विश्वास राहिलेला नाही, असा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान, श्री. महाजन यांचे पीआरओ अरविंद देशमुख यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

READ ALSO

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

काय म्हटलेय फिर्यादीत

यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते आपली पत्नी मुलगा व दोन मुलींसह गावात राहतात. त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे. गावातील स्वप्नील मधुकर पाटील यास ते चांगल्याप्रकारे ओळखतात. सहा महिन्यापूर्वी त्यांना मुलीने सांगितले होते की, स्वप्निल हा माझ्यामागे शाळेमध्ये मोटरसायकल घेऊन फिरत होता. त्यावेळी मी स्वप्निलच्या आईवडिलांना समक्ष घरी जाऊन समज दिली होती. परंतू गावातील संबंध असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. परंतु २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मी घरी होतो. तर माझी पत्नी शेतात गेली होती. त्यावेळी लहान मुलगी व तिच्यासोबत लहान भावाची मुलगी हे दोन्ही किराणा दुकानवर जातात असे सांगून घरातून निघाले. परंतु भावाची मुलगी घरी आली आणि माझी मुलगी आली नाही. यावर आपण भावाच्या मुलीला विचारले असता तिने सांगितले की, माझी मुलगी स्वप्नील पाटीलसोबत मोटरसायकलवर हिवरखेडा रोडकडे गेली आहे. त्यानंतर आम्ही मुलीचा शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. तसेच स्वप्निल हा सुद्धा घरी नव्हता. त्यामुळे स्वप्नीलने काहीतरी आमिष दाखवून आपल्या मुलीला पळवून घेऊन गेल्याचे म्हटले होते. या प्रकरणी २१ तारखेला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु या प्रकरणात सहा दिवस उलटले तरी पोलिसांकडून कुठलाही तपास झाला नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेत पुन्हा एक तक्रारी अर्ज दिला.

 

काय म्हटलेय पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी अर्जात

या तक्रारी अर्जात पिडीत पित्याने म्हटले आहे की, मूलीला फूस लावून पळवून नेणारा स्वप्निल पाटील हा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा चुलत साला आहे. तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी देविदास पाटील व सेवानिवृत्त माहिती अधिकारी वसंत पाटील यांचादेखील नातेवाईक असल्यामुळे पोलीस तपासात दिरंगाई करत आहे. स्वप्निलचे पोलिस व राजकीय क्षेत्रात नातेवाईक असल्यामुळे सदर प्रकरण दडपण्यात येत आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. तसेच जामनेर पोलिसांच्या तपासावर माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुलीस पळवून येणारा आणि या सर्व प्रकरणात मदत करणाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हावी व माझ्या मुलीला परत मिळवून द्यावे, अशी विनंती केली आहे. या प्रकरणात पिडीत मुलीच्या वडिलांनी मुलीला पळवून नेण्यात मदत करणाऱ्यामध्ये गावातील काही लोकांची नावे घेतली आहेत. तर ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, माझी मुलगी लहान आहे. आम्ही गरीब लोकं असल्यामुळे आमची कुणीही दखल घेत नाही. कुण्या मोठ्या माणसाबरोबर असं घडले असते तर पोलिसांनी तात्काळ आरोपीला उचलून आणले असते.

दरम्यान, या संदर्भात गिरीश महाजन यांच्यासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही. श्री. महाजन हे चाळीसगाव तालुक्यात कार्यक्रमात व्यस्त असल्याचे माहिती समोर आली आहे.  या प्रकरणाशी भाऊंचा दुरान्वये संबंध नाही. पोलिसांनी नि:पक्षने तपास करावा. कोणी काहींही आरोप लावेल त्यात काही तथ्य नाही. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना गिरीश महाजन यांचे पीआरओ अरविंद देशमुख यांनी देत सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
Next Post

पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा पुढे ढकला ; अॅड. कुणाल पवार यांची मागणी

October 12, 2020

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर

October 13, 2020

प्रवाशाचे प्राण वाचविणाऱ्या रणरागिणीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सलाम !

December 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group