TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लातुरात भरदिवसा कोयत्याने गळा चिरून खून ; मावसभावानेच केले सपासप वार !

vijay waghmare by vijay waghmare
October 18, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) मागील प्रकरणाची कुरापत काढून गुरुवारी (दि. १७) सकाळच्या प्रहरीच एका ३७ वर्षीय तरुणाचा कोयत्याने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे शिवाजी नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दयानंद गेट समोरील जुन्या रेल्वे लाईनवर ही घटना घडली. शिवाजी उर्फ अनिल देवकर (रा. बाबा नगर, खाडगाव रोड), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपी कृष्णा सुनील मुद्दे व मयत शिवाजी उर्फ अनिल देवकर (दोघेही रा. बाबा नगर, खाडगाव रोड) हे दोघे मावसभाऊ होते शिवाय ते चारचाकी कार भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. १० दिवसांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे चारचाकी कार पार्कीगच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी ते आले होते. मात्र, मागील प्रकरणाचा राग मनात धरुन कृष्णा सुनील मुद्दे, पद्मिनी सुनील मुद्दे यांनी कट रचून शिवाजी उर्फ अनिल देवकर याचा काटा काढण्याचे ठरिवले होते. दयानंद गेट समोरील जुनी रेल्वेलाईनवरील तोडकर एजन्सीसमोर आरोपीने शिवाजी उर्फ अनिल देवकर यांच्या मानेवर, छातीवर आणि हातावर सपासप वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

अवघ्या काही क्षणात शिवाजी उर्फ अनिल देवकर हा रक्ताच्या थारोळ्यात माखला होता. भर रस्त्यावर ही घटना घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मयत शिवाजी उर्फ अनिल देवकर यांची आई घटनास्थळी दाखल झाली होती. मुलगा रक्ताने माखलेला पाहून त्यांनीही टाहो फोडला. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत शवविच्छेदनासाठी मृतदेह हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला होता. मयताची आई विमल त्र्यंबक देवकर (रा. बाबा नगर खाडगाव रोड लातूर) यांच्या फिर्यादीवरुन सीआर ४२३/२०२४ कलम १०३ (१),६१ (२) बीएनएस ४,२५ अन्वेय शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टी.व्ही. पाटील हे तपास करीत आहेत.

या घटनेमधील आरोपी कृष्णा सुनील मुद्दे व मयत शिवाजी उर्फ अनिल देवकर हे मावसभाऊ तर होतेच पण राहण्याचे आणि व्यवसायाचेही ठिकाण एकच होते. चारचाकी कार भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय आणि पार्कीग ही दयानंद गेट समोरील जुनी रेल्वे लाईन परिसरात होती. काही दिवसांपूर्वी एका प्रकारावरुन त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर आरोपी कृष्णा सुनील मुद्दे हा व्यवसयाच्या ठिकाणी फिरकलाच नव्हता. गुरुवारी सकाळी जुनी रेल्वे लाईन येथे शिवाजीला पाहताच त्याने व इतर तिघांनी शिवाजीचा खून केला. त्यामुळे घटनेमागचे सत्य काय? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Killed by a coyote in broad daylight in Latur; Mother-in-law has done all the blows!Latur

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

वडली येथील शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसींचा गुरुवारी ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’, भुजबळ करणार नेतृत्व

June 16, 2021

भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी

June 23, 2021

बनावट सौदा पावत्या करून उद्योजकाची मिळकत हडपण्याचा प्रयत्न ; दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 4, 2022

बीएचआर घोटाळा : तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांची बदली ; स्थगिती मिळवण्याची प्रक्रीया सुरु !

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group