TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील अ.भा.जिवाजी सेना व शहरातील नाभिक समाजाच्यावतीने शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त गुजराथी गल्ली येथे प्रतिमा पूजन व जिवाजी महाले यांचे जीवनपट यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत सेवक जिवाजी महाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. जिवाजी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल. खोंडे होते. जयंती महोत्सवाचे प्रमुख वक्ते म्हणून विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते. कार्यक्रमाचे अतिथी गटनेते कैलास माळी, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, जेष्ठ नागरिक शशिकांत गुजराथी, रा.ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, मराठा नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, अ.भा.जिवा सेनेचे ता.अध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले, प्रथम सूर्यवंशी, नामदेव मराठे, चेतन जाधव, गोरख देशमुख, डी. एन.आहिरे, विशाल (पप्पू) पाटील, सुरेश सोनवणे, प्रफुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संत शिरोमणी सेनाजी महाराज व शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

याप्रसंगी जिवाजी महाले यांच्या जीवनावरील व्याख्यानाला सुरुवात झाली. यावेळी व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवरत्न, नरवीर जिवाजी महाले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सांगितले की, जिवाजी हे शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक होते. प्रतापगडावर झालेल्या अफझलखानाच्या भेटीप्रसंगी त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांवर होणारा वार आपल्या अंगावर घेतला व सय्यद बंडाला जिवाजींनी ठार करून शत्रूपासून महाराजांचे रक्षण केले. यामुळेच छत्रपतींनी अफझलखान व कृष्णा भास्कर कुळकर्णी सारख्या देशद्रोहींचा खात्मा केला. याच प्रसंगातुन” होते. जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” ही म्हण रूढ झाली. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना अठरा अलुतेदार व बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना मावळा अशी ओळख दिली. व “स्वराज्य म्हणजे आमच्या सर्वांचे राज्य” स्थापन केले. तसेच, व्याख्याते पाटील यांनी रायगड, प्रतापगड, शिवाजी काशीद यांचा दाखला देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे अतिथी बी एल खोंडे, संजय महाजन, कैलास माळी व वासुदेव चौधरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची स्तुती केली. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. बी.एल. खोंडे यांनी खासकरून तरुण वर्गाला उद्देशून म्हणाले की, तुम्ही उद्याचा भारत आहात, याकरिता महापुरुषांचे ग्रंथ वाचून विचार आत्मसात करायला शिकले पाहिजे, व महापुरुषांची प्रेरणा निश्चितच उपयोगी येईल असा संदेश उपस्थितांना दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपान वारुळे, सचिन झुंजारराव, आकाश झुंजारराव, गणेश निकम, निलेश कुवर, शुभम सोनवणे, आकाश कुवर, विक्की निकम, महेश फुलपगार, किरण बिरारी, दिपक बोरसे, हितेश ठाकरे, विक्की बोरसे, भानुदास झुंजारराव, सागर झुंजारराव, संजू झुंजारराव, सुनिल झुंजारराव, कैलास पाटील, दुष्यंत अहिरे, सागर महाले, भूषण वारुळे, विशाल झुंजारराव, भावेश झुंजारराव, कृष्णा झुंजारराव, केतन झुंजारराव व उज्वल महाले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणुक : 'या' ठिकाणी बंडखोरीची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! केंद्र सरकारकडून मिळणार थेट १०,००० रुपये !

February 15, 2022

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेरमध्ये स्वागत

September 3, 2022

‘फडणवीसांचे राजकारण म्हणजे ‘गां..’चे राजकरण’ ; प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर जहरी टीका !

March 14, 2022

मोठी बातमी : जळगावात शनिपेठ पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड !

November 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group