जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सम्यक जैन महिला मंडळातर्फे १० ते १६ वयोगटातील मुलांसाठी सोशल ग्लान्सच्या माध्यमातून तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विद्यार्थ्यांना हसत खेळत व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्यात आले.
सम्यक जैन महिला मंडळातर्फे १० ते १६ वयोगटातील मुलांसाठी सोशल ग्लान्सच्या माध्यमातून ‘लेट्स फ्लाय हाय’ या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खान्देश सेंट्रल येथे आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांनी संयम, आदर, सकारात्मक ऊर्जा, उत्तम अनुभव, उत्तम सरावच्या माध्यमातून स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास कसा साधावा यावर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप गांधी, मंजू राका, नयनतारा बाफना, आरती ललवाणी, राजेश जैन, दर्शन टाटीया आदी उपस्थित होते. शिबिरासाठी सम्यक जैन महिला मंडळाच्या उज्ज्वला टाटीया, सीमा खिंवसरा, मोहिनी सांखला, नम्रता चोरडिया, सोनल ओस्तवाल, भाग्यश्री कुमट यांनी परिश्रम घेतले.