TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणीने केलेल्या चाकू हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू

घरासमोर लघुशंका करणे बेतले जिवावर; संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना

vijay waghmare by vijay waghmare
June 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरासमोर लघुशंका केल्यामुळे झालेल्या वादातून राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणावर तरुणीने चॉपरने हल्ला केला. ही घटना दि. १ जून रोजी कोल्हे हिल्स परिसरात घडली होती. चॉपर हे तरुणाच्या छातीत अडकून पडल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविले होते. तेथे उपचार सुरु असतांना दि. ३ जून रोजी सकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

शहरातील समता नगरात राहणाऱ्या हर्षल संतोष घुगे (वय २०) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १ जून रोजी तो आणि त्याचे मित्र राहुल वाघोदे आणि नितीन सैनी हे त्यांचा मित्र सुमित लोखंडे याच्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणापूर्वी सर्वांनी कोल्हे हिल्स परिसरातील टेकडीवरील मोकळ्या जागेत एकत्र बसून मद्यपान केले. राहुल वाघुदे याने अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे, सुमित लोखंडे याने सर्वांना शकुंतला अपार्टमेंटच्या मागे असलेल्या त्याच्या घरी विश्रांतीसाठी घेवून गेला होता. राहुल वाघुदे हा घराबाहेर आला आणि तो सुमितच्या घरासमोर लघुशंका करू लागला. हे पाहून सुमितच्या घरात राहणारी त्याची मैत्रीण तमन्ना हिने राहुलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खुपसलेला चाकू अडकला राहुलच्या छातीत

तमन्नासह सुमित याने देखील बाहेर येऊन राहुलला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. हर्षल आणि त्याचे मित्र हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, तमन्ना रागाच्या भरात घरात गेली. तिने घरातून एक धारदार चाकू आणला आणि राहुलच्या छातीत आणि पोटाच्या मध्यभागी चाकू जोरात खुपसला. मात्र तो चाकू राहुलच्या छातीत अडकून पडल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत

राहुलच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू राहुलची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना, ३ जून रोजी पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना

राहुलला मारहाण करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित सुमित लोखंडे आणि त्याची मैत्रीण तमन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांच्या शोधार्थ एलसीबीसह तालुका पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth dies in knife attack by young woman

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्धव आणि राज ठाकरे हिंदुत्वासाठी येणार एकत्र?

June 29, 2022

नैतिकता सांगायची नाही तर आत्मसात करायची असते – विकास महाराज पाटील

October 29, 2020

जाणून घ्या….काय आहे आज सोने-चांदीचे दर !

August 8, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ऑगस्ट ते शनिवार 17 ऑगस्ट 2024 !

August 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group