सध्या राज्यातील राजकीय वातावरण उफाळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. भाजपाला मुख्यमंत्रीपदासाठी पोस्टरबाजीदेखील सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठीची रणनीती आखली जात आहे.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एक पोस्टर पाहायला मिळाले होते. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असा मजकूर लिहिला. असेच पोस्टर अनेक ठिकाणी पहायला मिळाले आहे. एक पोस्टर औरंगाबाद तालुक्यात, जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात हे भले मोठे पोस्टर लावले आहेत.विठुरायाला साकडे यानिमित्ताने घालण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अजून ठरायचे बाकी असतानाच अशी फ्लेक्सबाजी भाजपाकडून सुरू झाली आहे. औरंगाबाद तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याच प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत. सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या चर्चा रंगत आहेत. राज्यातील विकासाला खेळ बसली असून सेनेचेच आमदार महाविकास आघाडीच्या सत्तेला कंटाळले आहेत. त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा चांगले दिवस येण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशीच सर्वांची इच्छा आहे.