TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा

राज्यात दोन टप्प्यांत होणार निवडणुका?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यासंदर्भात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढील १५ दिवसांत या निवडणुकांसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. मात्र, या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत. त्या आता होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राज्यातील या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकांमध्ये एकूण १४ महापालिका आणि तब्बल २५ जिल्हा परिषदा असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

कोणत्या महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार?

राज्यातील नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या महानगर पालिकांची मुदत संपली असून त्यांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुदत संपून सहा महिने किंवा एक वर्ष झालेल्या महापालिकांच्या निवडणुका होतील, तर दुसऱ्या टप्प्यात नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक होईल. यापैकी औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर आणि वसई-विरार महानगर पालिकांची मुदत २०२०मध्येच संपली आहे. तर नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, मुंबई आणि ठाणे या महापालिकांचा कार्यकाळ नुकताच २०२२मध्ये संपला आहे.

दरम्यान, येत्या १७ जून रोजी प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यानंतरच ही सगळी प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सोडत निघेल. त्यावरील हरकती, सूचना ही प्रक्रिया झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध होतील. या सर्व प्रक्रियेला लागणारा वेळ पाहाता या निवडणुका ऐन पावसाळ्यात जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, शुक्रवार १३ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझी वसुंधरा अभियानअंतर्गत पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीने नववर्षाची सुरुवात

January 1, 2021

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; शिवसेनेची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

November 13, 2021

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 27 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2022 !

November 27, 2022

माहिती अधिकार दिनाचा फलक त्वरीत लावावा ; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group