धरणगाव (प्रतिनिधी) शहरात समस्त बहुभाषीक ब्राह्मण समाजतर्फे ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत आणि श्री विष्णु भगवान चे ६ वे अवतार यांचा जन्मोत्सव आज अक्षय तृतीयला धूम धड़ाक्यात आणि जल्लोशात साजरा करण्यात आला.
सकाळी १० वाजता भावे गली स्थित डॉ. किशोर भावे यांच्या घराजवळ आराध्य दैवत परशुराम भगवान चौक यांची प्रतिमाचे अनावरण शिवसेनाचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि समस्त बहुभाषीक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले. तत पश्चात महर्षि परशुराम भगवान चौक नामकरण करण्यात आले. प्रथम प्रतिमा पूजन एवं माल्यार्पण आणि भगवान परशुरामजी यांची आरती करण्यात येवुन प्रसाद वाटप करण्यात आला. सर्व प्रथम गावातील थोर श्री लाल बहादुर शास्त्री, छ. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर श्री परशुराम भगवान चौकचे संपूर्ण काम जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीतून तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या संकल्पनेतुन आणि शिवसेनाचे गट नेता, नगरसेवक आणि समस्त ब्राह्मण समाजाचे उदयोन्मुख नेतृत्व विनय (पप्पू) भावे यांच्या मेहनतीतून साकारण्यात आले असुन सर्व ब्राह्मण समाजाने या वरील तीन्ही राजकरण २०% आणि समाजकारण ८०% या शिवसेनेच्या ब्रीद वाक्यावर ठाम असलेल्या नेत्यांचे जाहिर आभार मानले असुन अभिनंदन केले आहे .
सदरील कार्यक्रमासाठी डॉ अरुण कुलकर्णी, डॉ किशोर भावे किरण अग्निहोत्री, विजयकुमार शुक्ला, आनंद बाचपाई, एॅड आशिष बाचपाई, विनोद शुक्ला, कोमल शुक्ला, नगरसेवक अंजली वीसावे ,विनय (पप्पू भावे), विलास महाजन, वासुदेव चौधरी, कैलास माली, ललित येवले, कडूसिंह बयस, धीरन पुरभे, पत्रकार लक्ष्मण माली, अविनाश बाविस्कर आदींसह धरणगाव समस्त बहुभाषीक समाजाचे शेकडो बंधु आणि भगीनी उपस्थित होते. संध्याकाळी ६ वाजता श्री बालाजी मंदिर येथून फुलाने तसेच रोशनाईने सजाविलेल्या रथावर भव्य दिव्य भगवान परशुरामजींची प्रतिमा सजवुन शोभा यात्रा काढण्यात आली.
प्रथम वाजंत्री, भजनी मंडळ, आणि वेगवेगळ्या वेशभूषा तसेच खास पुणेरी पगड़ी परिधान करुन समस्त ब्राह्मण समाज बंधु आणि भगीनी जोशात आणि आनंदात सामिल झाले होते. डेल्ची चौक् येथुन धरणी चौकात गेल्यावर महात्मा फुले यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शोभा यात्रा वाजत गाजत मेन बाजार पेठ, भावे गली स्थित भगवान परशुराम चौक गेल्यावर प्रतिमा पूजन माल्यार्पण करून आरती करण्यात आली. धरणगाव शहरात ब्राह्मण समाजाचा आणि तो ही जन्मोत्सव दिवशी अस्तित्वात आलेल्या महर्षी परशुराम भगवान चौकात शोभा यात्रा आल्यावर सर्व समाज बंधु आणि भगीनी संगीताच्या तालावर बेभान आणि आनंदात नाचत होते.
नंतर ब्राह्मण संघ येथे शोभा यात्रा पोहोचल्यावर सर्व समाज पदाधिकारी यांच्या हस्ते भगवान परशुरामजी यांचे प्रतिमा पूजन, माल्यार्पण, आणि महाआरती करण्यात आली. जन्मोउत्सवासाठी आलेल्या सर्व ब्राह्मण समाज वृंद, पुलिस प्रशासन, भजनी मंडल, सर्व उपस्थित श्रोतावर्ग, सर्व गावातील पत्रकार यांचे स्वागत अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले. समस्त ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष आणि समाज भूषण डॉ. किशोर भावे यांना नुकताच जळगाव जिल्हा होमियोपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासाठी डॉ अरुण कुलकर्णी आणि विजयकुमार शुक्ला यांच्या हस्ते शाल, श्रीफल, मानाची पुणेरी पगड़ी आणि सम्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला. आलेल्या सर्व परशुराम भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाचे समापन झाले. आलेल्या सर्व उपस्थित बंधु आणि भगीनी यांचा आयोजक समस्त बहुभाशीक ब्राह्मण समाज यानी आभार व्यक्त केले.