TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती

गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

जळगाव प्रतिनिधी : वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजार ३४० वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून सोमवार (दि. ६) पर्यंत लघुदाब वर्गवारीतील पर्यावरणस्नेही ७ लाख ६ हजार ९२४ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे व त्यांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन योजनेतील वीजग्राहकांचा वाढता प्रतिसाद सहभाग स्वागतार्ह आहे. त्यांना वीजबिल डिजिटल स्वरुपात पाठवले जात आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे’, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.
गेल्या तीन महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग – वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. विशेष म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २ लाख ३ हजार ३४० ग्राहकांची या योजनेत भर पडली आहे. यात सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील ८७ हजार ४० ग्राहकांचा तर कोकण प्रादेशिक विभागातील ७८ हजार ८२९ ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेत आतापर्यंत ७ लाख ६ हजार ९२४ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक २ लाख ८८ हजार २३८ (३.४६ कोटी), कोकण- २ लाख ६२ हजार २३७ (३.१५ कोटी), नागपूर प्रादेशिक विभाग- ८४ हजार ५३१ (१.०१ कोटी) आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये योजनेत सहभागी ७१ हजार ९१८ वीजग्राहकांना ८६ लाख ३० हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
असे व्हा योजनेत सहभागी – गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.
वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.
गो-ग्रीन योजनेचे फायदे – गो-ग्रीन सहभागी झालेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईल ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही ऑनलाईन बिल भरणे सोयीचे झाले आहे. इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणक किंवा मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitaran's 'Go-Green' scheme growing in popularity

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळोद येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

September 1, 2021

पोरीवरून नडले, सिग्नलवर भिडले ; कार चालकाने तरुणाला नेलं फरफटत

March 5, 2022

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’ ; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

September 11, 2021

हॉस्पिटलच्या आलिशान इमारतीमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्रावर छापेमारी !

July 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group