जळगाव (प्रतिनिधी) १ मे २०२३ कामगार दिनाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची नवीन सभासद नोंदणी सुरू होणार आहे.जळगाव जिल्ह्यातील माथाडी कामगार बांधवांनी सभासद नोंदणी करता संपर्क साधावा, असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन ॲड.जमील देशपांडे यांनी केले आहे.
उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्था जळगाव जिल्ह्यातील माथाडी कामगारांची एकमेव पतसंस्था असून माथाडी कामगारांच्या आर्थिक उन्नती करता संस्थेची नोंदणी करण्यात आलेली आहे. लवकरच संस्थेतर्फे कर्ज वितरण प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन ॲड.जमील देशपांडे यांनी दिली आहे.