जळगाव (प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांनी केली आहे. ते मनसेच्या आढावा बैठकीत बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, या निवडणुकांबाबत जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गट अध्यक्ष, गण अध्यक्ष, यांच्या नेमणुका करणे, संघटनात्मक बांधणी व ग्रामीण भागातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, अनिल वाघ, कमलाकर घारूर, मुकुंदा रोटे उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक प्रज्वल पाटील,तालुकाध्यक्ष राहुल काळे, तालुका अध्यक्ष जुगल पाटील,मधुकर भोई, अशोक पाटील विशाल सोनार धीरज वाघमारे, जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट अध्यक्ष गणअध्यक्ष व आजी-माजी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रावेर तालुका अध्यक्षपदी भगवान कोळी यांची नियुक्ती करण्यात आली तर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ उपजिल्हाध्यक्षपदी मनोज घुगे यांची नियुक्ती करण्यात आली.