TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशाचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी देऊन मोदींजींनी आदिवासी समाजाचा सन्मान केला – ना.गिरिष महाजन

चाळीसगाव येथे तंट्या तात्या भिल्ल जयंतीनिमित्त एकलव्य संघटनेचे अधिवेशन संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2022
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. देशाचे सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला त्यांनी संधी दिली व त्या पदावर बहुमताने विराजमान करून आदिवासी समाजाचा सन्मान केला. आदिवासी – भिल्ल समाज हा ऊसतोड व वीटभट्टी मजुरीच्या निमित्ताने स्थलांतरित होतो, त्यांना हक्काचे रेशन मग ते देशात कुठेही असले तरी मिळावे यासाठी “वन नेशन वन योजना” मोदिजीनी आणली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देशात २०१४ पर्यंत फक्त ९० एकलव्य मॉडेल स्कूल होत्या मोदी सरकार आल्यानंतर या शाळांची संख्या ६८१ इतकी झाली आहे. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकार हे आदिवासी समाजाच्या पाठीमागे असून इथे कोणतीही घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून भिल्ल समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित सखोल बैठक मंत्रालयात लावण्यात येईल असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी दिले. ते तंट्या तात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव येथे आयोजित एकलव्य संघटनेच्या महाअधिवेशनात बोलत होते.

यावेळी विचारमंचावर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, कन्नड येथील माजी जिल्हा परिषद सदस्या संजनाताई जाधव, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, माजी आमदार साहेबरावजी घोडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अजय पिंटू गायकवाड यांच्यासह एकलव्य संघटनेचे राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी – प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदिवासी भिल्ल समाजाच्या मागण्यांचे विविध १९ ठराव मांडण्यात आले. सदर अधिवेशनाला जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना आदी जिल्ह्यातील हजारो आदिवासी भिल्ल समाज बांधव उपस्थित होते.
आपल्या मनोगतात गिरीषभाऊ महाजन यांनी आदिवासी भिल्ल समाजाचा गौरव करताना सांगितले की, कष्टाळू व आहे त्या परिस्थितीत जुळवून घेणारा आदिवासी भिल्ल समाज असून अतिशय काटक शरीर असल्याने कोरोना काळात कुठलाही प्रादुर्भाव भिल्ल वस्त्यांमध्ये झाला नाही. मात्र समाजाने आता आपल्या प्रगतीसाठी व्यसनापासून लांब राहावे व शिक्षणाकडे लक्ष द्यावे. उसतोड करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील मुले व मुलींसाठी लवकरच राज्य शासन चाळीसगाव येथे वस्तीगृह उभारणार असल्याची घोषणा देखील नामदार महाजन यांनी केली. तसेच महापुरुष हे कोणत्या जातीपुरते मर्यादित राहत नाहीत ते आपल्या सर्वांचे असतात. मात्र काही मंडळी महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवत आपला स्वार्थ साधतात हे दुर्दैवी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

सदर महाअधिवेशनाची कन्नड येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनी आदिवासी गीतावर नृत्य सादर करत केली तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण देखील करण्यात आले. नामदार गिरीषभाऊ महाजन व मान्यवरांचे स्वागत एकलव्य संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले. एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी समाजाच्या मागण्यांचे ठराव मांडले. तसेच प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून समाजाची सद्यस्थिती कथन केली. पुरोगामीच्या नावाखाली आजपर्यंत कॉंग्रेस – राष्ट्रवादीने भिल्ल समाजाचा वापर केला मात्र एकही समस्या सोडवली नाही. मात्र आता शिंदे – फडणवीस सरकार कडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत असेही त्यांनी नमूद केले. आमदार किशोर आप्पा पाटील, संजनाताई जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, आमदार म्हणून काम करत असताना आजपर्यंत भिल्ल समाजाचा एकही कार्यक्रम मी टाळला नाही, कोरोना काळात खावटी साहित्य वाटप व्यवस्थित व्हावे यासाठी सलग ५ दिवस तालुक्यातील प्रत्येक भिल्ल वस्तीत फिरलो. त्यामुळे एक वेगळी नाळ माझी आदिवासी भिल्ल बांधवांशी जोडली गेली आहे.

भगवान एकलव्य यांच्या मूर्ती स्थापन करण्याचा अनुभव मांडताना त्यांनी सांगीतले की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाढ म्हाळसा येथे भगवान एकलव्य यांची मूर्ती स्थापन करायला काही पोलीस अधिकारी नियमांचे कारण सांगून परवानगी देत नव्हते, ही बाब मला जेव्हा कळाली तेव्हा मी स्वतः पातोंडा हून मूर्ती असलेली गाडी चालवत गावात गेलो व मूर्तीची स्थापना केली. एकलव्य हे कुणासाठी महापुरुष असतील मात्र आमच्यासाठी ते भगवान आहेत त्यामुळे त्याला कुणाच्याही परवानगीची गरज नाही असे आमदार चव्हाण यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाट करत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
शासनाच्या योजना राबविण्यासाठी तसेच प्रत्येक भिल्ल कुटुंबाचे रेशनकार्ड, प्रत्येक जेष्ठ व्यक्तीला पगार, आधार कार्ड काढण्यासाठी “माझी योजना – माझा हक्क हे ब्रीदवाक्य घेऊन एकलव्य स्वाभिमान अभियान” प्रत्येक आदिवासी भिल्ल वस्तीत राबविणार असल्याची घोषणा आमदार चव्हाण यांनी केली. त्यात सर्व कागदपत्रे मोफत, एक रुपयांची फी घेतली जाणार नाही, तसेच बहुतांश भिल्ल समाज हा उसतोड कामगार व वीटभट्टी कामगार आहे, त्यांची उसतोड कामगार व बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली जाईल असेही त्यांनी सांगीतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

गांधीविरोधी मुळं उखडून फेकणारे पुस्तक : महेंद्र पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : २० वर्षीय महिलेवर बलात्कार ; मुक्ताईनगर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

May 13, 2023

बापरे ! भरदिवसा २१ वर्षीय तरुणीची हत्या ; थरारक घटना वाचून तुमच्याही अंगाला येईल काटा !

February 27, 2022

‘मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता’ : मनसे नेते संदीप देशपांडे

May 22, 2021

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार ; जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र !

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group