धरणगाव (प्रतिनिधी) आज भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.
आज भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून काय कमतरता आहे. याची माहिती तहसीलदार देवरे, डॉ. बन्सी, डॉ. शाह व स्टॉप यांच्याशी चर्चा करून घेतली व रेमडीसीवीर इंजेक्शन व इतर औषधी नसल्यास सांगावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण व जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी फोनवर चर्चा करत लवकरात लवकर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात सेंटर ऑक्सिजन लाईनची व्यवस्था करा. तसेच ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर खरेदी करून तात्काळ पाठवावा, जेणे करून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा जीव जाणार नाही त्याच बरोबर दोन व्हेंटिलेटर तात्काळ उपलब्ध करून तात्पुरता स्वरूपात एम. डी. डॉक्टर व अधिकचा स्टॉप उपस्थित करावा.
इत्यादी आदेश केले त्याच बरोबर संताप व्यक्त करत सांगितले की, केंद्र शासनाचा निधी पडून आहे. आपण नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन वास्तूसाठी निविदा तयार करून टेंडर काढावे, मी सहकार्य करायला तयार आहे. भडगाव, पारोळा येथे एक ते दीड वर्षात नवीन प्रशस्त रुग्णालय इमारत उभ्या झाल्या आहेत. धरणगावात देखील नवीन वास्तू उभी राहावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न मी करेल. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी कोणीही या परिस्थितीत राजकारण करणार नाही. असे देखील भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सागितले.
सर्व कोरोना पॉंझिटीव्ह रुग्णाशी उन्मेषदादा पाटील यांनी तब्येतीविषयी आस्तेवाईक पणे चर्चा केली. त्याप्रसंगी जिल्हासरचिटणीस सचिन पानपाटील, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, भालचंद्र माळी, शहरसरचिटणीस कन्हैया रायपूरकर, राजू महाजन, टोनी महाजन, वासुदेव महाजन, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर, जुलाल भोई आदी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.