TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात खासदारांनीही घेतला सक्रिय सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्र संघटन जळगाव जिल्हा प्रशासन जळगावतर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज यावल तहसील कार्यालय स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ परिसराचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाच्या उदघाटनप्रसंगी उदघाटक खा. रक्षाताई खडसे यांनी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवित कचरा संकलन देखील केले.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून यावल येथे करण्यात आली. खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात झाली. प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती उपसभापती भंगाळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

कार्यक्रमाच्या अध्यक्षा रक्षाताई खडसे म्हणाल्या की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्लीन इंडिया उपक्रम सुरु केला आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून महिनाभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिनाभर सर्वांनी प्लास्टिकचा वापर करू नये, कोणालाही प्लास्टिक देऊ नये आणि प्लास्टिक घेऊ नये असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. आपण देशाचे नागरिक म्हणून क्लीन इंडिया, स्वच्छ भारत अभियान प्रत्येकाने राबविणे आवश्यक आहे. केवळ महिनाभर नव्हे तर नेहमीच सर्वांनी प्लास्टिकमुक्त परिसर ठेवून स्वच्छता ठेवावी, असे आवाहन खा.रक्षाताई खडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर म्हणाले कि, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानात १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी महिनाभर प्लास्टिक उपवास पाळत प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात प्रत्येकाने विशेषतः तरुणांनी सहभाग नोंदवित नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना सोबत घेऊन स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करावी असे आवाहन डागर यांनी केले.

खा.रक्षाताई खडसे यांनी पुढे सांगितले कि, तरुणांनी घर आणि परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यासाठी स्वत: तसेच इतरांना प्रेरीत करुन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. स्वच्छतेविषयी जागृतता निर्माण करावी. स्वच्छता अभियानात युवा तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी, जिल्ह्यातील नागरिकांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून प्लास्टिकमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले. यावल येथून सुरु झालेले स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये राबविले जाणार असून कचरा संकलन आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

महापौर जयश्री महाजन यांनी केले लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधींना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिजीलन्सचे पथक जळगाव आरटीओ कार्यालयात पोहोचण्यामागे ‘या’ वादाची किनार? ; आता रंगलीय ‘ही’ चर्चा !

September 21, 2021

१५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर

August 13, 2021

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

July 5, 2026

रिफॉर्मेशन कपचा पहिला दावेदार ठरला मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ !

February 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group