TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर जयश्री महाजन यांनी केले लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधींना अभिवादन !

महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत जळगावात विविध उपक्रमांचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘जय जवान, जय किसान’चा मंत्र देणारे भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच सत्य अन् अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास तसेच प्रतिमेस माल्यार्पण करून आज जळगाव शहरातील विविध कार्यक्रम, उपक्रमांतर्गत महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी विनम्रपणे अभिवादन केले.

याप्रसंगी महापालिकेसह शहरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत स्वच्छता अभियान, महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार, ‘कोविड-१९’अंतर्गत महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांचे लसीकरण, जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शहरात काढण्यात आलेली रॅली तसेच पुतळ्यास माल्यार्पण, प्रतिमापूजन आदी कार्यक्रम झाले.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

टॉवर चौकात शास्त्रीजींना अभिवादन

जळगाव शहरातील टॉवर चौकात असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास सकाळी साडेनऊच्या सुमारास महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महापालिका प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे, कोल्हे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

गांधी उद्यानात महात्मा गांधींना माल्यार्पण

महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास सकाळी दहाच्या सुमारास महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. महापालिका प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे, कोल्हे, योगेश वाणी यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

विधी सेवा प्राधिकरणातर्फे गांधीजींना अभिवादन, रॅली

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये आज शनिवार, दि. २ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पॅन इंडिया आऊटरीच प्रोग्रॅमचे रॅलीद्वारे उद्घाटन करण्यात आले. संबंधित रॅलीला जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव येथून सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरूवात होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात समारोप करण्यात आला. याप्रसंगी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादनही करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन, प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.ए. देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे, आर. एन. हिवसे, डी.ए. काळे, व्ही.बी. बोहरा, दिवाणी न्यायाधीश सौ.वंदना जोशी, एस.पी.सय्यद, जे.बी.पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.ए.के. शेख, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सचिव, एस.एस.मणियार लॉ कॉलेज व गोदावरी लॉ कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेत सफाईमित्रांसह महापौरांचा सन्मान

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज शनिवार, दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्याम गोसावी, पवन पाटील यांच्या हस्ते महापालिकेतील दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सकाळी साडेदहाच्या सुमारास निवडक २५ सफाई कर्मचार्‍यांचा तसेच अधिकाऱ्यांचाही “सफाईमित्र” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच ‘महापौर सेवा कक्षा’तर्फे शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसह विविध तक्रार निवारण करण्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महापौर जयश्री सुनिल महाजन यांचा महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

देशी दारूच्या दुकानांवरील 'सरकार मान्य' शब्द काढून टाका : नितीन विसपुते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा नगरपरिषदचे मागण्या मान्य करत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचे ठिय्या आंदोलन……

December 9, 2024

यावल तहसील कार्यालय परिसरात वाहन चोरीचा प्रयत्न हाणून पाडला !

November 16, 2023

पाडव्याच्या दिवशी देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात, ४ ठार, ११ जखमी !

March 23, 2023

ब्रेकिंग न्यूज : सुरज झंवरला सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका ; खालील कोर्टात जाण्याच्या सूचना !

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group