TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) –  महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री.धनंजय औंढेकर यांनी गुरुवारी (१८ जून) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते कार्यकारी संचालक (वितरण/प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. श्री.औंढेकर गेल्या २९ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
नवनियुक्त संचालक (संचालन) श्री.धनंजय औंढेकर हे मूळचे औंढा नागनाथचे (जि. हिंगोली) रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी तसेच एमबीए (फायनान्स), एनर्जी ऑडिटर, नवी दिल्ली येथून अॅडव्हान्स सर्टिफिकेट इन पॉवर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे. संचालक श्री.औंढेकर हे १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून माजलगाव (जि.बीड) येथे रूजू झाले. सन २००६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. त्यानंतर २०१६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून अधीक्षक अभियंता तर २०१९ मध्ये पदोन्नतीने मुख्य अभियंता पदी निवड झाली. या विविध पदांवर श्री.औंढेकर यांनी बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कल्याण, मुंबई मुख्यालयात काम केले आहे.
संचालक (संचालन) श्री.औंढेकर हे २०२४ पासून कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात महावितरणने मागेल त्याला सौर कृषिपंपमध्ये देशात प्रथम स्थान मिळवले. एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचा जागतिक विक्रम केल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जाहीर केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावरील सौर प्रकल्पांमध्ये देशात द्वितीय स्थान पटकावले. या योजनेसाठी महावितरणने देशात सर्वप्रथम फेसलेस-पेपरलेस ही ऑनलाइन सुविधा सुरू केली. नवीन वीजजोडणी, ग्राहक नावात बदल आणि वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरीची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये संचालक श्री.औंढेकर यांचे मोठे योगदान आहे.
‘अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात सांघिक कामगिरीतून कंपनीला अधिक सक्षम, ग्राहकस्नेही व हरित ऊर्जेकडे नेण्यास आणखी प्राधान्य देण्यात येईल. नवीन वीजजोडणीची प्रक्रिया फेसलेस-पेपरलेस म्हणजे पूर्णतः ऑनलाईन करण्यात येईल. सुरळीत वीजपुरवठा, दर्जेदार ग्राहकसेवा, वीज हानीमध्ये घट आणि महसूलवाढ हे मुख्य ध्येय आहे’, असे महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) श्री.धनंजय औंढेकर यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMr. Dhananjay Aundhekar assumes charge as Director (Operations) of Mahavitaran.

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातून ‘हे’ पार्सल परत पाठवायची वेळ आली ; राज्यपालांविरोधात मनसेसह राष्ट्रवादी आक्रमक !

November 19, 2022

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

October 28, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार १८ मे २०२३ !

May 18, 2023

भुसावळमधील रानातला महादेव मंदिर परिसरात २५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित !

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group