TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

ऑक्सीजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना मागेल तेव्हा तात्काळ वीजजोडणी उपलब्ध

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील १० मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ३५ कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड बाधितांच्या उपचारासाठी ऑक्सीजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑक्सीजन निर्मितीला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची मागणी होत आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री ना.श्री.प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. परिणामी ज्या कामांना इतर वेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

गेल्या महिन्याभरात तब्बल १० ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने अवघ्या ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच राज्यात ऑक्सीजन निर्मितीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. यामध्ये के चंद्रा इंजिनिअरींग वर्क्स (जेजूरी, जि. पुणे), ऑक्सीएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या २० मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्रकल्पांना केवळ ४८ तासांमध्ये ५२३ केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.

ऑक्सीजन प्रकल्पांची तातडीने क्षमता वाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली होती. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे. यामध्ये जेएसडब्ल्यू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात १०९ एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच के नायट्रोक्सीजन (सातारा), सोना अलॉईज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. यातील अनेक कामांमध्ये ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच संबंधीत जिल्हाधिकारी यांनी एकाच वेळी थेट चर्चा करून मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारीतील विषय मार्गी लावले आहेत, हे विशेष.

यासोबतच गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील ३५ कोविड रुग्णालयांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ११, अहमदनगर- ६, पुणे व नंदुरबार जिल्हा- प्रत्येकी ४, नाशिक, ठाणे व नागपूर- प्रत्येकी २, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा – प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण ३५ कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्विटरवर मोदीं लोकप्रिय, फॉलोअर्सची संख्या सात कोटींवर

July 29, 2021

गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती

March 13, 2021

धरणगावात रक्तदान शिबिराचे आयोजन ; ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

December 15, 2020

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group