TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मविप्र वाद : निंभोऱ्याहून कोथरूडला फिर्याद पोहचण्यास का झाला उशीर? ; जाणून घ्या कारणं !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निंभोरा पोलीस स्थानकात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी मविप्रच्या वादातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती. परंतु साधारण २५ दिवसानंतर ही फिर्याद सोमवारी कोथरूड पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्यानंतर गुन्हा दाखल होत, गुन्हा रजिस्टर नंबर फिर्यादला लावण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्याबाबत अवघ्या दोन दिवसावर हायकोर्टात सुनवाई आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस कामाला लागल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर निंभोऱ्याहून कोथरूडला फिर्याद पोहचण्यास झालेल्या विलंबामागे याचं महत्वाच्या मुद्द्यासह इतर काही कायदेशीर कारणं देखील समोर आली आहेत.

 

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी मविप्रच्या वादातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी दाखल केलेला गुन्हा कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. काही दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंदावली होती. परंतू सोमवारी रात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरनं ३/२१ असा आहे. अगदी सोमवारी कोथरूड पोलिसांकडे पोहचल्याचे कळते. मग प्रश्न असा उपस्थित होत होता की, फिर्याद २०/२५ दिवस होती कुठं?. फिर्याद तपासावर ठेवण्यात आली होती की, राजकीय दाबावापोटी गुन्हा दाखल करण्यात उशीर झाला की, ७ तारखेला या मुद्द्यावरून बचाव पक्षाला फायदा पोहचू नये म्हणून आता फिर्यादला सीआर देण्यात आला.

 

तर बचाव पक्षाला झाला असता मोठा फायदा

 

जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद देण्यात आली, असा युक्तिवाद फिर्याद रद्द करण्याच्या संदर्भात महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. त्यावर खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला निश्चित केली आहे. साधारण २५ दिवस ओलांडल्यानंतरही फिर्यादला सीआर नंबर देण्यात आलेला नव्हता. कोर्टात गेल्यानंतर जर फिर्यादीचा गुन्हा रजिस्टर नंबरच पोलिसांना सांगता आला नसता तर याचा फायदा बचाव पक्षाला फायदा होण्याची शक्यता होती. एवढेच नव्हे तर हाच मुद्दा पुढे करून बचाव पक्षाने फिर्याद रद्द करण्यावर जोर दिला असता. त्यामुळे कोर्टात संभाव्य धोका लक्षात घेता, सोमवारी गुन्ह्याला तातडीने रजिस्टर नंबर देण्यात आल्याची चर्चा आहे.

 

विलंबाचे अन्य एक महत्वपूर्ण कारण

शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस स्थानकाचा प्रभारी अधिकारी फिर्यादसह फिर्यादीचा मूळ जबाबाची कॉपी विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे पाठवतो. त्यानंतर विभागीय अधिकारी एका कव्हरिंग लेटर लावत ती कॉपी पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवतो. त्यानंतर पोलीस अधीक्षक सुद्धा एक कव्हरिंग लेटर तयार करत टपाल गुन्हा घडलेल्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक किंवा सीपी यांच्याकडे पाठवत असतो. त्यानंतर सीपी तेच टपाल एसीपीकडे पाठवतो. त्यानंतर एसीपी फिर्यादमध्ये तक्रारदाराने सांगीतलेला घटनाक्रम, घटनास्थळ लक्षात घेत ज्या हद्दीत गुन्हा घडला आहे, त्या पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकारीकडे सर्व कागदपत्र रवाना करतो. अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी मविप्रच्या वादातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध दिलेली फिर्याद अशाच पद्धतीने फिरल्यामुळे ती फिर्याद सोमवारी कोथरूड पोलीस स्थानकात पोहोचल्याचा अंदाज आहे.

 

दरम्मयान, राठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी २०१८ मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अॅड. विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी माजी मंत्री गिरीश महाजन,सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावर गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक या दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली होती. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद देण्यात आली, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला निश्चित करण्यात आली होती. तसेच संबंधित फिर्यादीबाबतची कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, गुन्हा वर्ग होऊन इतके दिवस झाल्यानंतरही राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप मूळ तक्रारदार अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित कंडारेच्या ड्रायव्हरला जामीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समता नगरमधील त्या आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून जामीन रद्द करा !

March 2, 2021

AIIMS च्या प्रमुखांनी वर्तवली लहान मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

June 23, 2021

मलाही अटक करा…’ते’ पोस्टर शेअर करत राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान !

May 16, 2021

मोठी बातमी : भुसावळचे पाच जण जिल्ह्यातून हद्दपार !

November 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group