TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिलासादायक : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबरोबरच माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून वेळेत रुग्ण शोधून त्यांचेवर त्वरीत उपचार होत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात 20 हजार 809 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते 87.87 टक्क्यांवर पोहोचले असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 358 ने कमी झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात 28 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 49 हजार 104 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. असे असले तरी जळगाव महसुल, पोलीस, जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमाने त्यापैकी 43 हजार 148 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश येत असून या रुग्णांचे वेळेत निदान करुन त्यांचेवर त्वरीत उपचार करण्यात येत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच आहे शिवाय रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 20 हजार 589 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असले तरी याच महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 220 ने अधिक आहे. या महिन्यात 20 हजार 809 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात महिन्याभरात 371 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर 2.43 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यातही प्रशासनाला यश आले आहे. त्याचबरोबर गेल्या सोळा दिवसांपासून जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 10 हजार 116 वरुन 4 हजार 758 पर्यंत म्हणजेच 5 हजार 358 ने कमी झाली आहे. हे जिल्ह्यासाठी आशादायक चित्र आहे.

जिल्ह्यात बाधित रुगण कमी होऊन बरे होणाऱ्या रुगणांचे प्रमाण वाढत असले तरी नागरीकांनी बेसावध न राहता बाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर राखावे, दिवसभरात किमान चारवेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

डॉ. अजित थोरबोले यांना फैजपूर पदाधिकाऱ्यांतर्फे निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एनआयएकडेच तपास दिल्याने हिरेन मृत्यू प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही : संजय राऊत

March 6, 2021

आडगावात बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार ; भडगाव तालुक्यात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी !

March 19, 2023

मुलाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग ; एरंडोल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 31, 2022

जळगावजवळ भरधाव ट्रकने किर्तनकाराला चिरडले !

December 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group