TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांनी हायकोर्टात मागितली बिनशर्त माफी ; म्हणाले, यापुढे…

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in कोर्ट, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे अशी विधाने करणार नाही, अशी हमी त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानी दाव्यातील अर्जावर एकल न्यायमूर्ती पीठासमोर सुनावणी पूर्ण होऊन निकाल येईपर्यंत वानखेडे कुटुंबियांविरोधात कोणतीही विधाने करणार नाही, अशी लेखी हमी हायकोर्टात दिल्यानंतरही मलिक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आक्षेपार्ह विधाने केली, असा आक्षेप नोंदवणारा अर्ज ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. त्यावरील सुनावणीनंतर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने मलिक यांना जाब विचारत कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध नोटीस का काढू नये, याबद्दल प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे मलिक यांनी आज चार पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आणि यापुढे वानखेडे यांच्याविषयी कोणतीही विधाने करणार नसल्याची हमी दिली.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

‘मी फक्त माझ्या सरकारी सेवकपदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत,’ असे मलिक यांनी सांगितले. ‘यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करतो. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी हमी मलिक यांच्याकडून हायकोर्टात देण्यात आली.

‘ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या अर्जात माझी तीन विधाने दाखवली असली तरी, ती मी प्रासारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधील आहेत. पत्रकारांनी विविध व व्यापक विषयांवर विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात माहिती देताना मी तशी विधाने केली होती, असे नमूद केले. त्यामुळे मी हायकोर्टात दिलेल्या हमीचे उल्लंघन होत नसल्याचा माझा समज होता. मात्र, वानखेडे यांच्याविषयीच्या कोणत्याही विधानाने कोर्टातील हमीचे उल्लंघन होते, असे मला आता समाजवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याविषयी कोणतेही विधान मी करणार नाही. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने होणारा वापर आणि त्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून पदाचा होणारा दुरुपयोग याविरोधात बोलण्यास मला प्रतिबंध असल्याचा अर्थ माझ्या या हमीचा घेतला जाऊ नये’, असे मलिक यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

१२ ते १७ डिसेंबर २०२१ रोजी राज्यस्तरी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता सरकारी अधिकारी अन् मंत्र्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन होणार अनिवार्य : नितीन गडकरी

February 19, 2021

आता निवडणुका होऊ शकत नाहीत ; देवेंद्र फडणवीसांचे विधान !

August 22, 2022

चोपडा : वीज कोसळून शेतमजूर जागीच ठार !

October 16, 2024

धरणगावात सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा ; महायुतीचे अनोखे आंदोलन !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group