TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळासाठी नवे बळ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री क्रीडांगण विकास योजनेतून 167 जिल्हा परिषद शाळांना ₹12.14 कोटींचा निधी मंजूर

vijay waghmare by vijay waghmare
January 22, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे तसेच खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजना’ राबविण्यात येत असून, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण 167 जिल्हा परिषद शाळांसाठी 12 कोटी 14 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये क्रीडासुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा कमी होत होता. परिणामी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक उत्साह व स्पर्धात्मक वृत्ती यावर परिणाम होत होता. आता या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नियमित खेळाची संधी मिळून त्यांचा शारीरिक – मानसिक विकास होण्यास चालना मिळणार असून शाळांमध्ये उपस्थिती व पटसंख्या वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

यापूर्वी जिल्ह्यात पालकमंत्री वॉल कंपाऊंड योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता शाळांमधील क्रीडासुविधा वाढवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत 99 शाळांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर 67 शाळांना प्रत्येकी 3 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे. शाळेतील उपलब्ध जागा, पटसंख्या व आवश्यक कामाचा विचार करून ही आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली असून, या शाळांमध्ये क्रीडांगण व पटांगणाचे सपाटीकरण करून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह 200 मीटर रनिंग ट्रॅक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे तसेच ज्या शाळांची पटसंख्या तुलनेने जास्त आहे, अशा शाळांची निवड शिक्षण विभागाने केली आहे.

तालुकानिहाय मंजूर शाळांची संख्या अशी
अमळनेर – 13, भडगाव – 7, पाचोरा – 14, भुसावळ – 7, पारोळा – 10, मुक्ताईनगर – 10, रावेर – 13, बोदवड – 4, यावल – 10, चाळीसगाव – 17, एरंडोल – 8, चोपडा – 10, धरणगाव – 11, जामनेर – 21, जळगाव – 11

“शाळांमधील शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. क्रीडांगण उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, शाळांमध्ये उपस्थिती वाढेल आणि पटसंख्येलाही चालना मिळेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार, आमदार यांचे सहकार्य लाभले असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविला जाणार आहे.
– गुलाबराव पाटील, पालकमंत्री

“पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास’ योजनेमुळे शाळांचे सर्वांगीण वातावरण सुधारेल. संबंधित यंत्रणांनी कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, यासाठी प्रशासनामार्फत नियमित आढावा घेतला जाणार आहे.” रोहन घुगे, जिल्हाधिकारी

“167 शाळांसाठी 12.14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तांत्रिक मंजुरी व कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही योजना निश्चितच दिशा देणारी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी गुणवत्तेवर विशेष भर दिला जाणार आहे.”
– मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaongulabrao patil

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 23 जानेवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

October 22, 2020

प्रास्ताविक कृषी कायद्या विरोधात कृषी निविष्ठा धारक आक्रमक ; आजपासून तीन दिवस दुकाने बंद !

November 2, 2023

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ४ झाले बरे !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group