TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

माहेरी जातांना भरधाव कारच्या धडकेत ठार

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – सहा दिवसांपूर्वी विवाह झालेली नववधू काकांसोबत दुचाकीने माहेरी जाण्यासाठी निघाली. परंतू पाळधीकडून जळगावकडे येणाऱ्या ओव्हरटेक करीत येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) या नववधूचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तिचे काका प्रवीण सुर्याजी पाटील (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार दि. १३ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर घडली, लग्नाच्या सहा दिवसातच विवाहितेवर दुर्देवी काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील देवराम नगरातील पोलीस अंमलदार विजय पाटील यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथील वैशाली पाटील यांचा दि. ७ जुलै रोजी मोठ्या धुमधडाक्यात विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर नवदाम्पत्य हे देवदर्शनासाठी गेले आणि दोन दिवसांपुर्वीच ते घरी परतले. नववधूला वैशाली हीला माहेरी घेवून जाण्याकरीता तिचे काका प्रवीण पाटील हे दुपारी जळगावला आले. जेवण आटोपल्यानंतर ते (एम.एच.१९-ईएच ०३०७) क्रमांकाच्या दुचाकीने कोळपिंप्री

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

काळजाचा थरकाप

जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पाळधीकडून जळगावकडे ओव्हरटेक करीत येत असलेल्या (एम.एच. ०२ बीटी-५९५८) क्रमांकाच्या भरधाव वाहनाने समोरुन जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की, यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या वैशाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे काका प्रवीण पाटील हे देखील गंभीररित्या जखमी झाले.

कुटुंबियांचा जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश

जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत वैशाली पाटील यांना मयत घोषीत केले तर त्यांच्या काका प्रवीण पाटील यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच वैशाली पाटील या नववधूच्या सासरच्यांसह माहेरच्या मंडळींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांना वैशाली पाटील यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी हंबरडा फोडीत एकच आक्रोश केला.

धडक देणारे वाहन पाळधी पोलिसांकडून जप्त

अपघातात मयत झालेली नववधू वैशाली पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुचाकीला धडक देणारे चारचाकी वाहन जप्त केले असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संसार फुलण्याआधीच जगाचा निरोप

वैशाली पाटील यांचे पती विजय पाटील हे पोलीस दलात कार्यरत आहे. सहा दिवसांपुर्वीच या नवदाम्पत्याच्या संसाराला सुरुवात झाली होती. परंतू सहा दिवसानंतर दुर्देवी काळाने नववधू असलेल्या वैशाली पाटील यांच्यावर झडप घालीत काही दिवसांपुर्वीच सुरु झालेला संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonmarried just six days agoNewlywed bridestruck down by tragedy

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

परिवर्तन तर्फे "आषाढस्य प्रथम दिवसे" निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकिनाका प्रकरण : परप्रांतीयांची नोंद ठेवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

September 14, 2021

महेंद्रसिंह धोनीला ट्विटरचा दणका ; पण नंतर ब्लू टिक केली परत !

August 7, 2021

राज्यपालांनी स्वत:चे पुरते वस्त्रहरण करून घेतलेय : शिवसेना

March 5, 2022

माथेफिरुने मध्यरात्री जाळल्या दोन कार

October 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group