TheClearNews.Com
Monday, November 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाडीबीटी योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

यावल आदिवासी विकास कार्यालयाचे काम उत्कृष्ट ; विकास प्रकल्पाच्या योजनांचा घेतला आढावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र व‌ राज्य शासनाच्या थेट लाभार्थी (महाडीबीटी) योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे काम उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी काढले.

आदिवासी विकास विभागाच्या यावल प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावल येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये प्रकल्प अधिकारी अरूण पवारसह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. पी. माहुरे, पवन पाटील, राजेंद्र लवणे, संशोधन अधिकारी संजय करवंदे, मीनाक्षी सुलताने, राकेश अहिरे, पी. व्ही. रोकडे, प्रशांत झांबरे, विकास पाटील, व्ही. व्ही. पडोळे आदी उपस्थित होते.

READ ALSO

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री गोळीबार ?

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत असलेल्या आदिवासी उपयोजनेत शंभर टक्के निधीची नियोजन व पुर्ननियोजन करण्यात आलेले आहे. न्यूक्लिऐस बजेटमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची योजना आहे. त्याच्यात ४० टक्के निधी खर्चाची मान्यता मिळालेली आहे. यामध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजनेमध्ये ४८ लाभार्थींना व्यवसायिक उपयोजना करण्यासाठी ८५ टक्के प्रमाणे आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात देऊन लोकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये लाभार्थी निवड अंतिम करण्यात यावी. भांडवली व महसूल कर्जाच्या आधारावर योजना तयार करण्यात याव्यात. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेषतः गणिताची गुणवत्ता सुधारण्यासाठी टॅलेंट सर्च परीक्षा करण्यासाठी या न्युक्लिअस बजेटमध्ये योजना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या डोळे, दंत तपासणीसाठी योजना करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास ३३०० विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. तीन तालुक्यांत असलेल्या ३२ पेसा ग्रामपंचायतीच्या खर्चाच्या संदर्भात बैठक घेण्यात यावी. यामध्ये खर्च, प्रशासकीय, तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश यांचा आढावा घेण्यात यावा. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येणाऱ्या ७ लाख रूपये निधीचा आढावा घेण्यात यावा. अशा सूचना ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या

केंद्र व‌ राज्य शासनाच्या थेट लाभार्थी (महाडीबीटी) योजनेत कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. यासाठी आढावा घेण्यात येणार आहे. स्वयंम योजनेतील लाभापासून आदिवासी विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. उपस्थित भत्ता ही आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत ९७ गावातील कामे मंजूर आहेत. तेथील कामे तात्काळ सुरू करावीत. त्याकरिता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिनस्त बैठक घेऊन सदरील बैठकीस कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, सर्व गटविकास अधिकारी यांना ही उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. समन्वय साधून कार्यवाही करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री वनधन विकास योजने बाबत ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला. सतराशेन (ता. चोपडा) येथील वनधन केंद्र बाबत माहिती प्रकल्प अधिकारी यांच्याकडून जाणून घेतली.

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कामाचेही केले कौतुक

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत यावल प्रकल्प कार्यालयाने तब्बल १६ कोटी ४२ लक्ष ९० हजार रुपयांचा निधी खर्च करून आदिवासी उपयोजनेत ५४.१७ टक्के निधी खर्च केला व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यावल प्रकल्पाचा पहिला क्रमांक आला म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांचे कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

November 22, 2026
गुन्हे

नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री गोळीबार ?

November 22, 2026
गुन्हे

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

November 22, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
क्रीडा

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

November 21, 2026
गुन्हे

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

November 20, 2026
Next Post

स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव दौऱ्यावर ; युवा संमेलनात युवकांशी साधणार संवाद !

February 11, 2024

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2025 !

September 9, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच? ; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची पुढील तारीख ठरली !

October 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group