धरणगाव (प्रतिनिधी) येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राजपूत समाज अध्यक्ष जीवन सिंह बयस, सतीश सिंह जनकवार, गोपाळ सिंह बयस, प्रल्हाद सिंह चौहान, गोपाळ सिंह जनकवार, जगदीश सिंह चौहान, मनोहर सिंह जनकवार, प्रशांत बिसेन, भागवत सिंह परदेशी, मदन सिंह परदेशी, मनोज जनकवार नरेंद्रसिंह जनकवार, डॉ शैलेश सिंह सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे सचिव गणेशसिह सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र परदेशी यांनी केले तर आभार धिरेंद्र सिंह पुरभे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज बांधव प्रताप प्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.