जळगाव ( प्रतिनिधी ) : हॉस्पीटलमध्ये कामाला असलेल्या नर्सचा पती रात्रीच्या वेळी महिला डॉक्टरला फोन करीत होता. त्यानंतर पगाराच्या विषयावरुन नर्सच्या पतीचे डॉक्टरांसोबत बोलणे झाले होते. मात्र त्यानंतर दि. १९ रोजी संशयिताने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालीत महिला डॉक्टरसोबत अश्लिल वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. या प्रकारामुळे महिला डॉक्टर प्रचंड घाबरुन गेल्यामुळे त्यांनी दि. २१ रोजी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आकाश वैजनाथ तायडे (रा. राधेश्याम कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराती एका परिसरात महिला डॉक्टरांचे हॉस्पिटल असून त्याठिकाणी संशयिताची पत्नी नर्स म्हणून नोकरीस होती.
दि. २१ जुलै रोजी संशयित आकाश तायडे हा हॉस्पिटलमध्ये आला आणि तो महिला डॉक्टरकडे बघून हसत होता. त्यानंतर संशयित हा महिला डॉक्टरला सायंकाळी किंवा रात्रीच्या सुमारास कॉल करुन बोलत होता. दरम्यान, महिला डॉक्टरने त्याला याबाबत विचारले असता, त्याने तुम्ही खूप छान बोलता मला तुमचे बोलणे खूप आवडते असे म्हणाला. त्यावेळी महिला डॉक्टरने त्याला माझे मोबाईलवर पुन्हा फोन करु नको असे सांगितले होते. दि. १९ जानेवारी रोजी संशयितासह त्याच्या पत्नीसोबत महिला डॉक्टरच्या पतीसोबत बोलणे झाले होते.
धीर दिल्यानंतर दिली पोलिसात तक्रार
या संपुर्ण प्रकारामुळे महिला डॉक्टर प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना धीर दिल्यानंतर त्यांनी दि. २१ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आकाश वैजनाथ तायडे (रा. राधेश्याम कॉलनी) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















