भुसावळ (प्रतिनिधी) जुन्या वादातून येथील पंचशील नगरात आनंद अशोक वाघमारे (३५) याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मे २०१८ मध्ये घडली होती. याप्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयाने प्रल्हाद होलाराम सचदेव या आरोपीला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या संदर्भात अधिक असे की, पंचशील नगरातील रहिवासी आनंद वाघमारे व प्रल्हाद होलाराम सचदेव यांच्यात जुने वाद होते. मात्र ते ६ मे २०१८ रात्री या दोघांची बोलाचाली होऊन प्रल्हाद याने आनंदा याच्यावर चाकूने वार केले. आरोपीने ११ वेळेस पोटावर व पाठीवर भोसकले होते. त्यामुळे आनंदचा जागीच मृत्यू झाला होता. आनंदला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. नंतर त्याला अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी भुसावळ येथील मे. सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी सेशन केस न. ५९/२०१८ मध्ये आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव यास भा. द. वी. कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यात दोषी धरून आज रोजी जन्मठेपेची व २००० हजाराचा दंड. तर दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपाण्यात आले होते. या खटल्यात मयताचा भाऊ फिर्यादी चेतन वाघमारे, हसन तडवी, प्रकाश गायकवाड, डॉ. एन.ए.देवराज यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभयोक्ता प्रविण पी. भोंबे यांनी काम पाहिले. तर तपासधिकरी पी.एस. आय. अनिस शेख आणि पैरवी अधिकारी म्हणून स. फौजदार समिना तडवी व केसवॉच गयास शेख यांनी काम बघितले. तर आरोपीतर्फे अॅड. अकील इस्माईल यांनी काम पाहिले. दरम्यान, आरोपी सचदेववर भुसावळ बाजार पेठमध्ये ५ तर वरणगाव पोलीस स्थानकात १ गुन्हा दाखल आहे.