जळगाव (प्रतिनिधी) एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. त्याच गल्लीतील एकाने दि. ५ रोजी दुपारच्या सुमारास १० वर्षीय मुलीस पाणी भरण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने आपल्या घरी बोलवून तिच्याशी अंगलटपणा केला. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी दीपक जगदाळे हे करीत आहेत.