धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांना युवक मित्र परिवार पुणे, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेकडून जळगाव जिल्ह्यातून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२१ साठी निवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, युवक मित्र परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन केले जाते. या संमेलनात राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक – युवती व उत्कृष्ट शैक्षणिक – सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक व पत्रकार बांधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सन्मानार्थी शिक्षक व पत्रकारांचे सामाजिक-शैक्षणिक चळवळीतील काम पाहून हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यामध्ये पुरस्कार प्राप्त होणे हे खूप भाग्याचे आहे. जळगाव जिल्ह्यातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपशिक्षक यांची उल्लेखनीय कामगिरी पाहून “उपक्रमशील शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी त्यांची निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी व्यक्तींना दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी सावरकर अध्यापन केंद्र, कर्वे रोड डेक्कन, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.