TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास…यामुळे विजयाचा विश्वास !

ना. गुलाबराव पाटील यांचे भावोदगार : पाळधी येथील जंगी सभेने भारावले पालकमंत्री !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2023
in Uncategorized, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून जातो यामुळे त्यांची देखील मला भक्कम साथ लाभली आहे. तर,कोणताही भेद न बाळगता केलेला चौफेर विकास यामुळे जनता देखील सोबत आहेच. याचमुळे विरोधकांनी कितीही आटापीटा केला तरी आपल्याला आगामी निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद लाभणारच ! अशा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथील ग्रामपंचायत जवळच्या मैदानावर नेहमीप्रमाणे जंगी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचा चिरपरिचीत आक्रमक शैलीत विरोधकांचा जोरदार समाचार घेतांनाच आजवरच्या वाटचालीत सर्वसामान्यांनी दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मान्यवर नेते आणि पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ना. गुलाबराव पाटील यांचे जबरदस्त स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या आभाराला उत्तर देतांना पालकमंत्री भारावल्याचे दिसून आले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून विविध जनहितार्थ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाला सकाळपासून ते रात्री पर्यंत पालकमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. तसेच याप्रसंगी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तर रात्री ८.०० वाजता पाळधी येथील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या मैदानावर ना. गुलाबराव पाटील यांचा अभिष्टचिंतनपर सभेचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्र्यांचे ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि जोरदार घोषणांनी स्वागत करण्यात आले. प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुभाषअण्णा पाटील आणि ऍड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबराव पाटील यांचा विकासाभिमुख वाटचालीचे तोंड भरून कौतुक करून यापुढे खांद्याला खांदा लाऊन एकजुटीने काम करणार असल्याचे सांगितले. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचे स्वप्न गुलाबभाऊंनी पूर्ण केल्याने त्यांना “पाणीवाले बाबा” ही पदवी मिळाल्याचे सांगितले. तर आमदार चंद्रकांत पाटील व आ. संजय रायमुलकर यांनी गुलाबभाऊंच्या सहकार्यानेच मुक्ताईनगरसह जिल्ह्याचा विकास होत असल्याचे आवर्जून नमूद केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी या सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना आपल्या जबरदस्त शैलीत भाषण केले. ते म्हणाले की, आजच्या सभेला उसळलेला हा जनसागर पाहून माझे मन भरून आले आहे. असे वाटते की आज निवडणूक झाली तर आजच आपण जिंकलेलो आहोत. आजच्या सभेत तरूणाईचा सहभाग पाहून मला देखील युवासेनेचा जिल्हाप्रमुख झाल्यासारखे वाटत आहे. तरूणांचा कल हा राजकारणात खूप महत्वाचा मानला जातो. आणि आजचे चित्र हे तरूण आपल्याकडे असणारे आहे. हे रॉ मटेरियल आपल्यासोबत असल्याने आपण निर्धास्त आहोत. आम्ही हिंदुत्वासाठी उठाव केला. आमचे उध्दव ठाकरे यांच्याशी वैयक्तीक शत्रूत्व नाही. मात्र हिंदुत्वासाठी आपण उठावाचा निर्णय घेतला. मात्र आता विरोधक यावरून करत असलेल्या टिकेला आपण जराही घाबरत नाही. आता धरणगावचे एक भूत माझ्यावर टिका करतेय, त्यांना माझे चॅलेंज आहे की, ही जागा शिवसेनेची होती. यामुळे त्यांनी हिंमत असेल तर उबाठातून मैदानात उतरावे. तर जे धरणगावचे नगराध्यक्ष होते तेच पाण्यासाठी मोर्चा काढत असल्याचा विरोधाभास हा जनतेच्या लक्षात आल्याची टिका देखील त्यांनी केली. आतापर्यंत न दिसणारे लोक आता मतदारसंघात दिसू लागले आहेत. मात्र मी त्यांच्यासारखा सीझनेबल पुढारी नसल्याची टिका त्यांनी केली. तर विरोधकांकडे वाटण्यासाठी रग्गड पैसे असतील तर ते पैसे हिसकावण्याची धमक आमच्यात असल्याचे देखील ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आजवरच्या राजकीय वाटचालीत आपण केवळ आणि केवळ जनतेच्या हिताचा विचार केला. पाळधीकरांच्या ऋणातून उतराइ र्होण्यासाठी येथे पाणी पुरवठा योजनेचा काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यापासून पाळधीकरांना दररोज पाणी मिळणार असल्याची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली. तर पाणी पुरवठा खात्यातीत केलेल्या कामांमुळे मला पाणीवाले बाब म्हणून उपाधी मिळाली असून आज जणू काही पाळधीत पाणीवाल्या बाबांची जत्रा भरल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर ह. भ.प. रवीकिरण महाराज, बुलढाणा आ.संजय रायमूलकर, आ.किशोर आप्पा पाटील, आ.चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिता माळी – कोल्हे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पी.एम .पाटील, नाना सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, आबा माळी, रविंद्र चव्हाण सर, सचिन पवार, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी पी. सी.आबा पाटील, सुभाषअण्णा पाटील, संजय महाजन, शिरीष बयास, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील,दूध संघाचे रमेश पाटील, पंचायत समितीचे सभापती, जनाआप्पा कोळी, प्रेमराज पाटील, पप्पू भावे, विलास महाजन, भगवान महाजन, दोन्ही पाळधीचे सरपंच प्रकाश पाटील, शरद कोळी, शोभाताई चौधरी, ज्योतिताई शिवदे, जनाक्रांतीचे मुकुंद सपकाळे, पंचायत समिती सदस्य, शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला मोठ्या प्रमाणात जनसागर उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन पाटील सर यांनी केले. आभार युवा नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन प्रतापराव पाटील व त्यांच्या टीमने केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ७ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 25 डिसेंबर 2055 !

December 25, 2025

वाद विकोपाला : भांडणाच्या रागात पती-पत्नीने एकमेकांना घेतलं पेटवून

January 16, 2022

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

September 23, 2021

धरणगावात पोलीस स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजन

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group