धरणगाव (प्रतिनिधी) आज स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. बी. मोरे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, जेष्ठ शिक्षीका एम. के. कापडणे यांच्या हस्ते १ जानेवारी १८४८ रोजी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे भिडेच्या वाड्यात काढून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे भारतातील थोर समाज सुधारक – क्रांतीसुर्य – सत्यशोधक – राष्ट्रपिता – तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार, एम. बी. मोरे, एस. व्ही. आढावे, एस. एन. कोळी, सी. एम. भोळे, हेमंत माळी, पी. डी. पाटील, व्ही. टी. माळी, श्रीमती व्ही. पी. वऱ्हाडे, श्रीमती. एम. जे. महाजन, लिपीक जे. एस. महाजन, पी. डी. बडगुजर, जीवन भोई, ग्रंथपाल गोपाल महाजन, अशोक पाटील, प्रदिप पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.