पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायततर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच सरलाबाई बडगुजर तसेच उपसरपंच मंगल आण्णा, ग्रामसेवक बोरसे यांच्या उपस्थितीत ५० वृक्ष लागवड स्मशानभूमी परिसरात करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बडगुजर, प्रकाश लोखंडे, सुनील बडगुजर, बालू शर्मा, धोंडू, सरलाबाई लोखंडे, शंकर पवार, मनोज मालू, देविदास चौधरी, शांताराम मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.