धरणगाव (वृत्तसंस्था) राष्ट्रीय विकलांग पार्टी दिल्ली या पार्टीच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदि पी.एम.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धरणगाव जि जळगाव येथील मा.नगराध्यक्ष निवासी मूकबधिर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, बुलंद पोलीस टाईमचे उपसंपादक पी.एम.पाटील हे २५ वर्षा पासून दिव्यांग, निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा भावी काम करतात त्यांच काम पाहून त्यांना राष्ट्रीय विकलांग पार्टी महाराष्ट्र यांनी पी.एम.पाटील यांची जळगांव जिल्हा अध्यक्ष पदि निवड करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष के.के दीक्षित, श्रीमती गोलू हाजीजी, श्रीमती राजकुमारी शुक्लाजी, पंकज त्रिपाठी, प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड, उपअध्यक्ष धनंजय कुमार यांनी अभिनंदन केले.