धरणगाव (प्रतिनिधी) आज ‘पोलिओ लसीकरण मोहीम’ राबविण्यात येत आहे. धरणगाव येथील डॉ. लीलाधर बोरसे यांच्या हॉस्पिटल येथील बूथवर शुभारंभ करण्यात आला.
पालकांनी आपल्या ०-५ वर्षाच्या आतील बालकांच्या सुदृढ आयुष्यासाठी जवळच्या बुथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा, असे आवाहन मान्यवरांनी केले. यावेळी उपस्थित धरणगाव शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. लीलाधर बोरसे,माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, परीट समाजाचे जिल्हा संघटक छोटू जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख रवि जाधव, डॉ. विलास महाजन, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, निलेश पाटील, गोपाल पाटील, श्याम पाटील, अशोक नेवे आदी उपस्थित होते.