TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोपटानी यांचे आरोप निराधार ; महावितरणचे स्पष्टीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनीतील वीजग्राहक पोपटानी यांचा वीजपुरवठा वीजबिलाच्या थकबाकीमुळे नियमानुसार खंडित केलेला आहे. तसेच वीज मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे गोपाल पोपटानी यांच्यावर यापूर्वी वीजचोरीचा गुन्हा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोपटानी कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे, महावितरणची बदनामी करणारे व जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

२३ डिसेंबर रोजी पॉवर हाऊस शाखेचे सहायक अभियंता जयेश तिवारी, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे, तंत्रज्ञ नमो सोनकांबळे, कनिष्ठ कार्यालयीन सहायक योगेश जाधव, कंत्राटी कर्मचारी गुणेश ननवरे हे वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर भागात गेले होते. त्यावेळी वीजबिल न भरलेल्या ग्राहकांना सूचना दिल्याने त्यातील काहींनी बिलाचे पैसे भरले. ज्यांनी बिल भरले नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तेथील एक ग्राहक टिकमदास परमानंद पोपटानी यांनी ७५ दिवसांपासून बिल भरलेले नाही. महावितरण कर्मचाऱ्यांनी पोपटानी यांना आवाज देऊन घराबाहेर बोलवले व त्यांना वीजबिल भरून सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र यावेळी किशोर पोपटानी यांनी अचानक महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हातातील टिकाव अभियंता तिवारींच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पोपटानींच्या हातातून टिकाव हिसकावला. पोपटानींनी कर्मचाऱ्यांशी झटापट करून त्यांना मारहाण केली. या प्रकारात तिवारी व योगेश जाधव यांच्या डाव्या कानाला तसेच नमो सोनकांबळे यांना पाठीला मार लागला. तसेच पोपटानींनी दगड उचलून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. महावितरणचे कर्मचारी शासकीय कर्तव्य पार पाडताना पोपटानींनी त्यात अडथळा आणून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत किशोर पोपटानींवर त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

यानंतर २५ डिसेंबर रोजी गोपाल पोपटानी तसेच किशोर पोपटानींच्या पत्नीने पत्रकार परिषदेत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांवर बिनबुडाचे व धादांत खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली. महावितरणने स्पष्ट केले आहे की, पोपटानी यांच्यावर नियमानुसारच वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. सहायक अभियंता तिवारी यांनी कोणत्याही महिलेस धक्काबुक्की अथवा गैरवर्तन केलेले नाही. ७५ दिवसांपासून थकीत असलेले वीजबिल भरण्याची विनंती केल्यावर किशोर पोपटानींनी अभियंता व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी संबंधित रोहित्र तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामागे इतर कोणताही उद्देश नव्हता. ज्या गोपाल टिकमदास पोपटानींनी पत्रकार परिषदेत महावितरण व कर्मचाऱ्यांची बदनामी केली, त्यांच्यावर वीज मीटर बायपास करून ७८ हजार १४० रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा २० नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. यावरून पोपटानींची वीजचोरी करण्याची व वीजबिल न भरण्याची पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पोपटानींनी आकसबुद्धीने व पूर्वग्रह बाळगत पत्रकार परिषद घेऊन महावितरणची बदनामी व सामान्य जनतेची दिशाभूल केली आहे, असे महावितरणने म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

अर्ध सैनिक बल जवानांना सैनिक बला सारख्या सुविधा मिळाव्यात ; अॅड.जमील देशपांडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मास्कधारी लुटारूंनी एकाला मारहाण रोकड लुटली ; रावेर पोलीस दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा !

June 10, 2023

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर सामाजिक कार्यकर्ते नईम अख्तर यांची हरकत !

May 14, 2022

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात, नवाब मलिक यांनी दिली ‘ही’ माहिती !

March 29, 2021

PM Modi संतापले ! म्हणाले, ‘मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत पोहोचू शकलो हा तुमच्या मुख्यमंत्र्यांना निरोप द्या’

January 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group