TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता : मेलेली माणसं…ग्रामपंचायतच्या दप्तरी जिवंत ; चक्क पैसेही काढले !

चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर निघण्याची शक्यता : प्रसाद सूर्यवंशी यांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) या जगातून निघून गेलला व्यक्ती परत कधीच येत नाही. परंतू हा चमत्कार मजरे हिंगोणा ग्रामपंचायमध्ये घडला आहे. एवढेच नव्हे तर, मयत व्यक्तींच्या नावावर पैसे काढण्यात आली असून चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर निघण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आपण गटविकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सुधाकर सुर्यवंशी यांनी याबाबत आज पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराजचे आलेले पेमेंट मयताच्या नावावर काढून मोठा भ्रष्टाचार केला आहे. ज्या व्यक्तींना मयत होवून पाच ते दहा वर्ष होऊन गेली आहे, अशांच्या नावाने सर्रास पेमेंट काढली गेली आहेत. त्यामुळे काढलेले पैसे कुणाच्या घशात गेली ?, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देखील सुर्यवंशी यांनी केली आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

पंचायतराज योजनेत कामाला आलेले पोपट यादव पाटील 16/10/2009 ला मयत झाले आहेत. तरी त्यांच्या नावावर व्हाऊचर क्रमांक OWN/2022– 23/R/64 ह्या व्हाऊचरने दि.08/2/2023 रोजी 5726/- रुपये रोख काढले आहेत. तसेच व्हाऊचर OWN/2022– 23/R/53 ह्या व्हाऊचरनेही रोख 5025/- रुपये काढण्यात आले आहेत. यात एकूण 10751/- रुपये रोख काढण्यात आली आहेत. तसेच पितांबर दौलत धिवर हे 19/9/2014 ला मयत झाले आहे त्यांचा नावे व्हाऊचर क्रमांक OWN/2022–23/R/2 यातून 1800 /- रोख काढण्यात आले आहे. तर OWN/2022–23/R/3 हया व्हाऊचर द्वारें 2306/- रुपये रोख काढण्यात आले आहे. व उत्तमराव बाबूराव पाटील हे दि.5/4/2013 ला मयत झाले आहेत. ह्यांच्या नावावर व्हाऊचर क्रमांक OWN/2022–23/R/20 ह्या व्हाऊचर द्वारे 3100/- रुपये रोख काढण्यात आले आहे.

ग्रामपंचायतने असे किती व्हाऊचर तयार केली? आणि किती पैसे काढण्यात आले?, याची सखोल चौकशी केली तर लाखों रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो. भ्रष्टाचार करणाऱ्या जो कोणी असेल त्याला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाठिशी न घालता संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी देखील प्रसाद सूर्यवंशी यांनी केली आहे.

प्रसाद सूर्यवंशी यांनी हे प्रकरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा दि.27/9/23 ला तक्रार दिली आहे. मात्र, साधी चौकशी सुद्धा केली नाही. दरम्यान, मजरे हिंगोणा या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण हे चक्क चोपडा येथील विश्रामगृहावर सुरू होते. त्यावेळी देखील काही वृत्तपत्रानी बातम्या लावल्या होत्या. मात्र त्यावेळेस अधिकाऱ्यांनी संबंधित इसमाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घातले तर लाखो रुपायांची अफरातफर निघू शकते. तसेच त्यांच्याकडून पैसे वसूल करून संबंधितांनावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी अशी मागणी देखील प्रसाद सूर्यवंशी यांनी केली आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

चाळीसगावच्या भावी लेफ्ट. कर्नलचा बॉक्सिंग खेळताना मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊतांनी केले अंधारेचे कौतुक….

November 11, 2022

मद्यधुंद अवस्थेत डॉ. डांगे पुन्हा बसले थेट ‘डीन’च्या खुर्चीवर ; अधिष्ठात्यांना शिवीगाळ !

September 28, 2020

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन

October 5, 2020

‘…म्हणूनच भाजपने आज अजितदादांना बोलू दिले नाही’ ; रोहित पवारांना संशय

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group