अहमदनगर (वृत्तसंस्था) जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झालेल्या ३० वर्षीय महिलेला न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने राहुरी येथील पोलिस अधिकाऱ्याने संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी (१७ जुलै) शहर हद्दीत ही घटना घडली. याबाबत पीडित महिलेने मंगळवारी (१८ जुलै) रात्री राहुरी पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सज्जन किसन नाऱ्हेडा याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सदर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले की, देवळाली प्रवरा येथील व्यक्ती विरुद्ध जमीन खरेदीत फसवणूक केल्याबाबत तक्रारी अर्ज देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस दूरक्षेत्र गेली होती. नाऱ्हेडा याच्या केबीनमध्ये जात त्यांना तक्रार अर्जाची हकिगत सांगितली. यानंतर त्यांनी उलट-सुलट प्रश्न विचारले. त्यानंतर ते म्हणाले की, तुमचे काम मी करून दिल्यास यामध्ये माझा काय फायदा आहे. तेव्हा त्यांना पिडीता म्हणाले की, मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देईल. ते मला म्हणाले की, पैशा व्यतिरीक्त माझा काय फायदा होईल. त्यावेळी पिडीतेने आणखी पैसे पाहिजे असेल, तर देईल. त्यावर नाऱ्हेडा याने मला पैसे नको, मला काय पाहिजे ते समजून घ्या. त्यावर पिडीता त्यांना म्हणाले, मला असे काही बोलु नका, तुम्हाला माझी विनंती आहे. नंतर त्यांनी पिडीतेचा तक्रार अर्ज ठाणे अंमलदार यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर आठ दिवसांनी नाऱ्हेडाला फोन करून माझ्या तक्रार अर्जाबाबत विचारपुस केली. त्यावर त्याने सांगितले की, मला फोन करायचा नाही. तुमचे काय काम आहे ते माझ्या ऑफिसमध्ये येवुन मला सांगायचे.
पिडीता राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी आली असता पोलीस स्टेशन समोर उभी असताना नान्हेडा यांनी त्यांच्या मोबाईल नंबरच्या व्हॉटसअप वरुन पिडीतेला ‘तु खुप छान दिसते, असा मेसेज केला. त्यानंतर ते मला व्हॉटसअपवर ‘तू माझ्याशी मैत्री करशील का’, असे मेसेज करू लागले. त्यांनी केलेल्या मेसजला मी रिप्लाय न दिल्याने ते ‘प्लिज जानु रिप्लाय दे, असा मेसेज केला. तसेच पिडीतेच्या व्हॉट्सअॅपवर कॉल करून ‘तुला मला भेटायचे आहे, असे म्हणू लागले. तेव्हा मी त्यांना हे शक्य नाही, असे म्हणाले. त्यानंतर पिडीतेने (दि. ८ जुलै) नान्हेडा यांच्या विरुध्द पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानंतर देखील नान्हेडा याने पिडीतेला व्हाईस कॉल करून तु माझ्या विरुध्द तक्रारी अर्ज का केला, असे म्हणून तुझ्या विरुध्द मी गुन्हा दाखल करील, अशी धमकी दिली. तसेच व्हाइस कॉल करुन ‘तू जर माझ्याकडे आली नाही, तर मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर मी काहीपण कृत्य करीन’, अशीही धमकी दिली.
दि. १७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पिडीता कामानिमित्त तहसील कार्यालय राहुरी येथे आले असताना नान्हेडा तेथे येवून पिडीतेला म्हणाले की, तुला आता माझ्या सोबत यावे लागेल, तेव्हा मी त्यांना नकार दिल्यावर त्यांनी धमकी दिली. त्यामुळे दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिडीता राहुरी स्टेशन रोडला त्याच्या रूमवर गेली. तेथे त्याने पिडीतेवर जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेया घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.
















