TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीएसआय सुरेश पांचाळ यांच्या ‘आमु नवी पिढीना तरुण पोरं’ गाण्याने लावले लोकांना वेड !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) एखाद्या गावाचा इतिहास त्या गावाच्या स्मृतिपटलाच्या गाभ्यात दडलेला असतो. तो गावातील खाणाखुणांमधून डोकावत राहतो. त्याचे संदर्भ हरवतात, त्याची भाषाही गहाळ होते. अन् स्मृतिपटलावर फक्त राहतात ती तोडकीमोडकी चित्रे. या चित्रांचा क्रम लावत एखाद्या गावाचा इतिहास आपले अस्तित्व अन् वैभवाच्या खुणा दाखवित राहतो. अशीच काहीशी आहे अमळनेर तालुक्याला पहिला आमदार देणार्‍या, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकी विद्यालयाच्या रूपाने अमळनेरसह इतर तालुक्यातील ग्रामीणांसाठी शिक्षणांची कवाडे उघडणार्‍या आणि आमदारांचे गाव म्हणून परिचित असलेल्या अमळगावची. मात्र, गेल्या 35 वर्षांपासून स्थानिक राजकारण्यांनी स्वाहाकार करत गावाचे नाव मोठे लक्षण खोटे ठरवत माती केली आहे.

दिशाहीन झालेल्या अमळगावला योग्य दिशा देण्यासाठी खाकी वर्दीतील एक दर्दी युवा नवतरूणांमध्ये ‘उमेद’ जागवत पुढे सरसावला आहे. ज्याला कोणताही राजकीय वारसा नाही, ज्याला वतनदारी नाही आणि घराणेशाहीचाही तो वारस नाही. त्याने पाचवीला पुजलेले अठराविश्‍व दारिद्रय, गावकुसाबाहेरील असह्य, नरकयातनेतील जीणे जगत स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या बळावर पोलीस दलात उपनिरीक्षक पद गाठले आहे. आपण आता कुठे आहोत याचे भान व आपण कुठून आलो आहोत याची जाणीव ठेवत संबंध गावाशी केवळ आपुलकीच्या भावनेतून तो नाड जोडून आहे. गावातील तरूणांचा स्पर्धा परीक्षकडे कल असला पाहिजे म्हणून त्याने समविचारी मित्रांसोबत उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. वेळप्रसंगी अडलेल्या नडलेल्यांसाठी तो पदरमोड करतो. तो ऐवढ्यावरच थांबलेला नसून आपल्या गावची दशा बदलली पाहिजे, गावाला योग्य दिशादर्शक मिळाले पाहिजेत यासाठी जाणीव जागृती करत आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत सुरेश भीमराव पांचाळ यांना चौखुर विषयांचे वाचन आणि लिखाणाचा मोठा व्यासंग आहे. पोलीस दलात ईमाने-ईतबारे कर्तव्य बजावत असताना प्रचंड व्यस्ततेतही ते वेळ काढून वाचन व स्वतःचे लिखाण करत असतात. सुमारे 300 पेक्षा अधिक विविध विषयांवर त्यांनी कविता रचल्या आहेत. त्यांचे स्वरचित “खावाव नै, खाऊ देवाव नै…खाणाराले जीरू देवाव नै…लाई दिसुत जीवले घोरं, तुमना लाई दिसूत जीवले घोर, आमु नवी पिढीना तरुण पोरं” हे अहिराणी बोलीभाषेतील गाणे नुकतेच यु-ट्यूबवर रिलीज झाले आहे. त्यानंतर लगेचच हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून नेटीझन्सचा(नेटकरी) उदंड प्रतिसाद लाभत आहे.

या गाण्यातून त्यांनी आपल्या गावाची जी दुर्दशा झाली आहे ती दूर सारली जाऊन योग्य दिशा देण्यासाठी तरूण पीढीसह ग्रामस्थांना आर्जव केली आहे. भुरट्या, चोरट्या पुढार्‍यांच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत अंजन घातले आहे. योजना हडप करणार्‍यांना, प्रत्येक कामात मलिदा खाणार्‍यांना, ग्रामपंचायतीतून आपली घरे भरणार्‍या परंपरागतांना, ग्रामपंचायतीला आपल्या कमाईचे व घर चालविण्याचे साधन मानणार्‍यांना, गावाला ओंगाळवाणे स्वरूप आणणार्‍यांना, गावगाड्याला अस्वच्छतेमुळे रोगराईच्या विळख्यात अडकविणार्‍यांना धडा शिकविल्याशिवाय आणि निवडणुकांमध्ये घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहू नका, असे स्फुरण त्यांनी चेतविले आहे. यासाठी त्यांनी अमळगाव हे गाव डोळ्यासमोर ठेवले असले तरी अमळगावसारखीच किंबहुना त्याहुनही विदारक अवस्था अनेक गावांची आहे. त्यामुळे त्यांचे गाणे लोकप्रिय झाले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १० जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुटुंबियांचा लग्नाला विरोध…मध्यरात्री प्रेमीयुगल भेटल्यानंतर घडलं भयंकर ; प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

July 6, 2023

कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या ; महावितरणने सुचवले सुरक्षतेचे उपाय

April 23, 2023

पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू !

March 17, 2023

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १० फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘टेडी डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group