धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचेबाबत सोशल मिडीयावर काही अपप्रवृत्तीनी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी धरणगाव तालुका मनसेतर्फे धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
याबाबत अधिक असे की, सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी व अश्या कृती विरोधात संबंधीतांविरूध्द गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची निवेदनाव्दारे मनसे धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे व तालुका सचिव राजू बाविस्कर, मुस्तुफा खान, मयुर गुरव, महेंद्र कोळी, दिपक पाटील, रविंद्र महाजन, श्रीनाथ सपकाळे आदी कार्यकर्त्यांनी धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे केली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. तरी सदरील मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल करणारे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.