TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रश्मी शुक्ला यांनी दबाव आणला होता, ठाकरे सरकारमधील ‘या’ नेत्याची कबूली

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. यावरून आता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट केलं की ‘होय, मला भाजपमध्ये जाण्यासाठी दीड वर्षापूर्वी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता’, अशी कबुली त्यांनी दिली आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच, रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकल्याचा आरोप सरकारकडून केला जात होता. राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. शुक्ला यांनी दबाव टाकला होता, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्याला यड्रावकर यांच्या कबुलीने पुष्टी मिळाली आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही कानावर घातल्याचे यड्रावकर म्हणाले आहेत. सरकार स्थापन करताना यड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकला होता, असे ट्विट आव्हाड यांनी केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर यड्रावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संध्याकाळपर्यंत फोन न उचलण्याची भूमिका घेतली होती. संध्याकाळी मात्र त्यांनी ही कबुली दिली आहे.

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले. तत्पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. मात्र, जागा वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. विजयानंतर त्यांनी भाजप सोबत यावे यासाठी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केला होता असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘होय, मला रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता.’

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी यावर अधिक माहिती दिली. ‘भाजप सोबत येण्यासाठी मला काहींनी संपर्क साधला होता. पण, जनतेने मला निवडून दिल्याने त्यांच्या मताचा आदर राखण्यासाठी ते जे सांगतील ते करणार असल्याचे आपण तेव्हा स्पष्ट केले. त्यानंतर शिरोळ येथे मी मेळावा घेतला. सर्वांनी मला शिवसेनेसोबत जाण्याचा आग्रह धरला, त्यानुसार मी हातात शिवबंधन बांधले,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ब्रेकिंग न्युज : धरणगाव शहरातील जनता कर्फ्यु ३० मार्चपर्यंत वाढवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर ; १४ हजार २६६ कोटींच्या खर्च होणार !

August 4, 2022

बंडखोरी नव्हे तर हरामखोरी, माझे वडीलही चोरायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल !

July 24, 2022

‘सीबीआय’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

April 24, 2021

वीजबिल वसुलीच्या कामाला गती द्या ; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group