TheClearNews.Com
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा विकासाचे विक्रमी नियोजन !

कोविडच्या आपत्तीतही ५१3 कोटींमधील ९६ टक्के निधीचा वापर - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाचे प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकीकडे कोरोनामुळे जिल्हा विकासाच्या निधीला कात्री तर दुसरीकडे कमीत कमी वेळात नियोजन करण्याची धांदल या दुहेरी आव्हानांना तोंड देत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त ५१३ कोटींच्या निधीतून तब्बल ९६ टक्के निधीचा वापर करण्यात आला असून हा नवीन विक्रम ठरला आहे.

यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना (एससीपी)- आणि आदिवासी उपयोजना/आदिवासी उपाययोजना क्षेत्रा बाहेरील (टिएसपी/ओटीएसपी) या सर्व वर्गवारींच्या अचूक नियोजनाचा समावेश आहे. यामुळे विकासकामांच्या नियोजनात जळगाव जिल्हा हा राज्यभरात आघाडीवर राहील हे स्पष्ट झाले असून यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचे सहकार्य फलदायी ठरले आहे.

READ ALSO

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

याबाबत वृत्त असे की, ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या विविध खात्यांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींबाबतची माहिती आज जाहीर करण्यात आलेली आहे. यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण वर्गवारीसाठी ३७५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३१ मार्च अखेरीस ३५४ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून तरतुदीशी याचे प्रमाण ९४.३१ इतके टक्के आहे. अनुसूचित जाती उपयोजना (एससीपी) या वर्गवारीसाठी ९१ कोटी ५९ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ८९ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून याचे तरतुदीशी प्रमाण तब्बल ९८.०१ टक्के इतके आहे. यासोबत, आदिवासी उपयोजना/आदिवासी उपाययोजना क्षेत्रा बाहेरील (टिएसपी/ओटीएसपी) या वर्गवारीसाठी ४६ कोटी ८५ लक्ष रूपयांची तरतूद होती. यापैकी ४६ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून तरतुदीसोबतची याची टक्केवारी ९७.०८ टक्के इतकी आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या नियोजनात कोविडच्या प्रकोपामुळे अनेक अडचणी आल्या. यात कोविडमुळे वार्षिक योजनांचा निधी कमी करण्यात आला. या निधीला मान्यता मिळत नाही तोच ११ डिसेंबर २०२० ते १८ जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने कामांचे नियोजन करता आले नाही. अर्थात, गेल्या वर्षी निधीचे नियोजन व वितरणासाठी फक्त चार महिने मिळाले. यातही ४० दिवस हे आचारसंहितेत गेले. मात्र असे असले तरी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी एन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आणि विविध खात्यांच्या अधिकार्‍यांच्या अचूक नियोजनामुळे प्राप्त तरतुदीशी खर्चाची टक्केवारी-९५.३१ तर वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी-९९.७५ टक्के इतकी साध्य करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करतांना काळ-काम-वेग; निधीची उपलब्धता, कामांसह निधी वितरणाचे अचूक नियोजन या सर्व बाबी अतिशय महत्वाच्या असतात. यामुळे आजवर जिल्हा नियोजनातून ८० टक्क्यांच्या वर कधीही निधी वापरण्यात आलेला नव्हता. यामुळे तरतुदीतील बराचसा निधी हा अखर्चित म्हणून परत जात असे. तथापि, कोविडची आपत्ती, निधीची कमरता, नियोजनासाठी कमी वेळ या सर्व नकारात्मक अडथळ्यांवर मात करून यंदा अगदी अचूक नियोजन करण्यात आल्याचे अधोरेखीत झाले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही इतके अचूक नियोजन फार क्वचीत पाहण्यास मिळते. यामुळे जळगाव जिल्हा विकासकामांच्या नियोजनात यंदा आघाडीवर राहणार असल्याचे संकेत देखील यातून मिळाले असून याचे सर्व श्रेय हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाला आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

त्रैमासिक विवरण पत्र सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

May 16, 2025

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू !

July 28, 2022

भाजीपाला विकणाऱ्या ७० वर्षाच्या मथुराबाई गायके यांनी जिंकली लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर !

September 28, 2023

शिक्षक दिनानिमित्त आ. चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केला शिक्षकांचा सत्कार !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group