TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून पर्यावरणाचा संदेश..

vijay waghmare by vijay waghmare
July 18, 2026
in जळगाव, विशेष लेख, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

जळगाव, (प्रतिनिधी) : एखाद्या मुलाच्या हातात मातीचा छोटासा गोळा असतो, पण त्या गोळ्यात दडलेले असते उद्याचे हिरवेगार जंगल. अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे दि. १३ ते १८ जुलै दरम्यान “अनुभूती ट्री फेस्टिव्हल” साजरा करण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीड बॉल (बीजगोळे) तयार करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. माती, सेंद्रिय खत आणि स्थानिक वृक्षांच्या बियांचा वापर करून तयार होणारे सीड बॉल विद्यार्थ्यांसाठी केवळ एक उपक्रम नव्हते, तर निसर्गाशी नवे नाते जोडणारा अनुभव ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता, हातात माती आणि मनात हिरवे भविष्य घडविण्याचे स्वप्न दिसत होते.
जैन इरिगेशन चे सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अनुभूती स्कुलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या संकल्पनेला प्राचार्य मनोज परमार यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कृतीची जोड दिल्याने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम संस्मरणीय ठरला.
जैन इरिगेशनचे गार्डन विभागाचे अजय काळे, गिरीष जगताप, पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, मयूर देशमूख तसेच सर्व ताई-दादांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना देशी वृक्षांच्या बिया, माती आणि नैसर्गिक खताचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सीड बॉल तयार केले. हे सीड बॉल पावसाळ्यात विविध ठिकाणी टाकून, त्याद्वारे हरित क्षेत्र वाढविणे, नैसर्गिक वनस्पतींचे पुनरुज्जीवन आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
समारोप कार्यक्रमात संचालिका अंबिका जैन यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉलचे वितरण केले. यावेळी अंबिका जैन बोलताना म्हणाले की, ‘हॅण्ड, हार्ड आणि हेड याद्वारे निर्माण झालेली सीड बॉल हे निसर्गाशी जुळणारी कृती आहे. कारण त्यांनी स्वत: ते केले आहे. वनसंवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाप्रती संवेदनशीलतेचा यातून संदेश जातो. विद्यार्थ्यांना ‘ग्रीन अम्बेसेडर’ बनून अधिकाधिक झाडे लावण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आणि पर्यावरण संरक्षणाला आपल्या जीवनाचा भाग बनविले पाहिजे.
खेळता-खेळता मुलांनी बीजसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश आत्मसात केला. वर्गखोल्यांबाहेर घडलेला हा उपक्रम मुलांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला. सीड बॉल पावसाळ्यात डोंगराळ, दुर्गम आणि ओसाड भागात फेकल्यास योग्य वातावरण मिळाल्यावर त्यातून रोपे उगवतात आणि नैसर्गिकरीत्या हरितक्षेत्र वाढण्यास मदत होते. ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आली. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, याची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजल्याचे प्राचार्य मनोज परमार म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हातात सीड बॉल घेत “झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरण वाचवू” अशी सामूहिक प्रतिज्ञा केली. या निरागस हातांनी तयार केलेले बीजगोळे उद्या हजारो वृक्षांचे रूप धारण करतील, अशी आशा व्यक्त करत ‘अनुभूती ट्री फेस्टिव्हल’ ने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSoil in hand... nature in heart! Students sowed the seeds of a green future through seed balls.

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 19 जुलै ते 25 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या ईकरा थीम महाविद्यालयात वृक्षारोपण !

July 19, 2022

पिंप्री येथे बचत गटांसाठी “बहिणाबाई मार्ट” उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

May 3, 2025

काँग्रेसमध्ये ट्वीस्ट, नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसह नेतेही नाराज

January 25, 2021

भयंकर : नोकरी गेल्याने रागाच्या भरात आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या!

November 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group