धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आज ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेचे रचियता साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे. एस. पवार यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस.पवार, हेमंत माळी, एस. व्ही. आढावे, सी. एम. भोळे, एम. बी. मोरे, पी. डी. पाटील, व्ही. टी. माळी, जे. एस. महाजन, पी. डी. बडगुजर तसेच शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.