TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’साठी ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू ; वाचा, काय सुरु आणि काय बंद

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव दिले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी (‘ब्रेक दि चेन’) ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत नवीन निर्बंध लागू केले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात कडक नियम लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे.

जिल्ह्यात कलम १४४ ची अंमलबजावणी व रात्री संचारबंदी, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू राहील. या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात शिरू नये वा फिरू नये व त्यांनी त्यांच्या घरात वास्तव्य करावे. संचारबंदी कालावधीत वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा यांना हालचाल करण्यास कुठल्याही निर्बंधाशिवाय परवानगी राहणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक अथवा गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिलेले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केलेल्या आदेशात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार खालीलप्रमाने याची माहिती जाणून घ्या.

READ ALSO

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

-हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने (सर्व आठवडे बाजार बंद राहतील)

-सर्व मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृह, प्रेक्षक गृहे, ६. सार्वजनिक मैदाने हे रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० पावेतो बंद राहतील. तसेच शुक्रवारी रात्री ०८.०० ते सोमवारी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत बंद राहतील.

-सर्व Non- Essential दुकाने, मार्केट व मॉल्स मधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सुरु राहतील.

– सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर योग्य प्रकारे मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्तीवर रुपये ५००/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्ती तसेच वाहन चालकावर प्रत्येकी रुपये ५००/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

-को ऑपरेटीव्ह , पीएसयु व खाजगी बैंक, BSE/NSE, विज वितरण कंपनी, टेलीकॉम सेवा पुरवठादार, विमा/मेडीक्लेम कंपनी, औषधी वितरण / निर्मिती संबंधित कार्यालये वगळून इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

-सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) 50% कर्मचारी यांच्या उपस्थितीतीबायत कार्यालय प्रमुख यांनी कोविड-१९ प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावा.

-विज, पाणी , बैंकिंग व इतर वित्तीय सेवा देणारे ६. कार्यालये १००% अधिकारी /कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील.

-सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील बैठका एकाहून अधिक कार्यालयाशी संबंधित असतील तर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात.

-खाजगी वाहने व खाजगी बसेस यांना दि. ५ एप्रिल, २०२१ पासून केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० वाजेपावेतो वाहतूक करता येईल. तसेच दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून तेदिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो शुक्रवार रात्री 08.00 वाजेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाच्यतिरीक्त वाहतूक करण्यास मनाई असेल.

-सर्व सिनेमा हॉल्स, ड्रामा थिएटर्स, सभागृहे, मनोरंजन पार्कस/ आकेड्स/ व्हिडीओ गेम पार्लर, वांटर पार्क,क्लब स्विमोग पूल, जिम व स्पोर्ट कॉम्प्लेक्सेस बंद राहतील.

-सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स व बार बंद राहतील. (अपवाद जे रहिवासी हॉटेलचे अविभाज्य भाग आहेत.)

-सर्व रेस्टरेट/हॉटेल्स मानकांना टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलीव्हरी सुविधा या केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल. तसेच शनिवार व रविवारी केवळ सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत होम डिलीव्हरी सुविधा देता येईल. (म्हणजेचं कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर ऑर्डर देण्यास किंवा घेण्यास येता येणार नाही.)

-सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे हे बंद राहतील.

धार्मिक स्थळावर नियमित पूजा-अर्चा करणा-या व्यवतीनी त्यांची नियमित पूजा-अर्चा ही कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश न देता सुरु ठेवावी.

– केशकर्तन शॉप / स्पा/ सलून / ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना बंद राहतील.

-सर्व वृत्तपत्रांना वितरण व छपाई करता येईल. सर्व वृत्तपत्रे हे दररोज सकाळी 07.00 ते रात्री

-08.00 वाजेपर्यंत वितरीत करता येतील.

– सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालय बंद राहतील

-तथापि इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस सुट राहील. परीक्षेचे कामकाज पाहणारा कर्मचारी वर्गाने एकतर लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.असे प्रमाणपत्र 48 तास वैध राहील. -सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील.

-कोणत्याही विद्यार्थ्यास परिक्षेस उपस्थित राहण्यासाठी सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 व शुक्रवार ते सोमवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 वाजे दरम्यान परिक्षा केंद्राच्या ठिकाणी व घरी जाण्यासाठी वैध असलेले प्रवेशपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

-सर्व प्रकारचे धार्मिक/ सामाजिक/ राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी असेल,

-ज्या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्यांच्या बाबतीत मेळाव्यासाठी या अटीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल

-कोणत्याही राजकीय मेळाव्यास भारत निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार बंदीस्त सभागृहात 50 % लोक किंवा 50 % क्षमतेसह आणि मोकळया जागेत 200 लोक किया 50% समतेसह कोविड-19 नियमावलीचे पालन करुन परवानगी असेल.

-लग्न समारंभ हे 20 लोकांच्या उपस्थितीत साजरा करता येतील.

-तसेच मॅरेज हॉल मधील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.

-कोविड -19 लसीकरण करुन न घेतलेले व कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट नसलेले कर्मचा-यांवर रुपये 1000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापना यांचेवर देखील रुपये 10000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

-विक्रीच्या जागेवर खाण्यासाठी कोणासही खाद्यपदार्थांची ब्रिकी करता येणार नाही. तसेच विक्रीसाठीचे पदार्थ झाकून ठेवण्यात यावे. तथापि पार्सल किंवा होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत देता येईल.

-बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे अशाच टिकाणचे बांधकामे सुरु राहतील,

-कामगारांना ये-जा करण्यास बंदी राहील. तथापि बांधकाम साहित्याची ने-आण करण्यास मुभा राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
Next Post

वाढदिवसानिमित्त माजी आमदार शिरीष चौधरींनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : ‘बीएचआर’ खंडणीच्या गुन्ह्यातील संशयिताच्या शोधार्थ एसआयटीचे पथक पोहचले चाळीसगावात !

February 2, 2023

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

October 27, 2023

सीबीआयमधून बोलतोय, तुम्ही एका गुन्ह्यात अडकलेले ; भामट्यांनी चाळीसगावच्या महिलेकडून उकळले साडेआठ लाख रुपये !

June 13, 2024

मोठी बातमी : शिवसेना नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत? केसरकर म्हणतात…!

July 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group